AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्सवात विरजण…दहीहंडीची रस्सी बांधताना तोल गेला, मुंबईतील धक्कादायक घटना; विविध ठिकाणचे जखमी किती?

राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दही हंडीची रस्सी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे.

उत्सवात विरजण...दहीहंडीची रस्सी बांधताना तोल गेला, मुंबईतील धक्कादायक घटना; विविध ठिकाणचे जखमी किती?
Dahi-Handi
| Updated on: Aug 16, 2025 | 5:55 PM
Share

राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दही हंडीची रस्सी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दही हंडीची रस्सी बांधताना बाल गोविंदा पथकचा एक सदस्य खाली पडला होता, लगेज त्याला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र भर्ती करण्याच्या पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जगमोहन शिवकिरन चौधरी (32) असं या गोविंदाच नाव आहे.

दहीहंडी उत्सवातील जखमी गोविंदांची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांनी दिली आहे. यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत 30 गोविंदा जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

मुंबईत आतापर्यंत 30 गोविंदा जखमी, 15 जणांना डिस्चार्ज तर 15 जणांवर उपचार सुरू

  • मुंबई शहर – जखमी 18; उपचार सुरू 12 , डिस्चार्ज – 6
  • मुंबई पूर्व उपनगर – जखमी 6; उपचार सुरू 3, डिस्चार्ज 3
  • मुंबई पश्चिम उपनगर – जखमी 6; उपचार सुरू 1, डिस्चार्ज 5
  • एकूण – 30 जखमी; उपचार सुरू- 15; डिस्चार्ज 15

याआधी रविवारी दहिसर परिसरात दहीहंडीच्या सरावादरम्यान एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. हा मुलगा सहाव्या थरावर उभा होता, मात्र अचानक संतुलन बिघडल्याने तो खाली पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दहीहंडीचा हा सराव परवानगीशिवाय सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहीहंडी उत्सवात सुरक्षा महत्वाची

दहीहंडी उत्सवात अनेकदा अपघात होत असतात. यातील बरेच अपघात हे सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने होतात. दहीहंडीच्या उत्सवात वर चढणाऱ्या गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, खाली गादी असणे आवश्यक आहे. तसेच अपघात झाला तरी तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका आणि इतर व्यवस्था देखील असणे गरजेचे आहे.

मुंबईत मुसळधार पावसात दहीहंडी

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसातही दहीहंडी मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल जखमी गोविंदांची माहिती

1) आदित्य रघुनाथ वर्मा यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 2) कृष्णा मिठू स्वयन यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. 3) समर बन्सीलाल राजभर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

मुंबईच्या के ए एम रुग्णालयात जखमी गोविंदासाठी विशेष उपचाराची सोय

मुंबईच्या के ए एम रुग्णालयात जखमी गोविंदासाठी विशेष उपचाराची सोय करण्यात आली आहे. विशेष डॉक्टरांची टीम जखमी गोविंदांसाठी सज्ज आहे. आज सकाळ पासून एकूण 22 जखमी गोविंदाना उपचारासाठी आणण्यात आले आहे.यातील 21 जखमी गोविंदाना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.