गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जामनेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

  • अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 15:49 PM, 16 Oct 2020
Girish Mahajan

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या (Threat Calls To Girish Mahajan) आरोपीला जामनेर पोलिसांनी अखेर अटक केली. ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’ अशी धमकी गिरीश महाजन यांना देण्यात आली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी तपास करत दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत (Threat Calls To Girish Mahajan). महाजनांना धमकी देणारी ती व्यक्ती पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

जामनेरमध्ये बुधवारी (14 ऑक्टोबरला) जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरुन ही धमकी देण्यात आली. “गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊन”, असं धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितलं.

खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही, तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. “सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या, नाही तर बॉम्ब ब्लास्ट करु”, अशी धमकी यावेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली होती. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असंही त्यांनी सांगितलं.

या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामनेर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अटक केली. या आरोपीचे नाव अमोल देशमुख आहे. तो पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत आहे. त्याने गिरीश महाजनांना अशी धमकी का दिली याचा पोलीस तपास करत आहेत.

Threat Calls To Girish Mahajan

संबंधित बातम्या :

गिरीश महाजनांच्या घरी गुप्त बैठक सुरु, वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला दांडी – एकनाथ खडसे

भाजपचे ‘संकटमोचक’ अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार

वादळाचा कोकणाला मोठा फटका, 100 कोटींच्या मदतीने काही होणार नाही : गिरीश महाजन