AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती महिला नव्हे तर एक.. आरोपीने लोकलमधील पीडितेबाबत सांगितली धक्कादायक माहिती, पोलिस तपासात वेगळे वळण..

Mumbai Local Shocker Video : मुंबईच्या लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओने खळबळ उडाली. त्यामध्येच पोलिसांनी आरोपीला अटक केले. मात्र, आरोपीने धक्कादायक दावा केला.

ती महिला नव्हे तर एक.. आरोपीने लोकलमधील पीडितेबाबत सांगितली धक्कादायक माहिती, पोलिस तपासात वेगळे वळण..
Mumbai Local Shocker Video
| Updated on: Aug 08, 2026 | 9:22 AM
Share

मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये चक्क एक व्यक्ती आपल्या कंबरेचा बेल्ट काढून एका महिलेच्या दिशेने धावून गेला. शिवीगाळही करण्यात आला. तो तेवढ्यावरच थांबत नाही तर तिच्या कानाखाली अनेकदा मारतानाही दिसला. आजूबाजुला मोठी गर्दी होती. मात्र, उपस्थित असलेल्यांपैकी एकही जण पुढे येऊन त्या महिलेला वाचवताना दिसले नाही. ज्यावेळी महिलेवर बेल्ट काढून तो व्यक्ती मारण्यासाठी तिच्याकडे धावून जात आहेत, त्यावेळी डाव्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडून घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. महिलेला शिवीगाळ होत होता, त्यावेळी दोन तरूण शेजारी बसलेले होते. मात्र, यात कोणीही पडले नाही. सर्वांची फक्त बघ्याची भूमिका घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळाला.

पोलिसांनी व्हायरल व्हिडीओनंतर महिलेला मारहाण करणाऱ्याचा शोध घेत 12 तासात व्यक्तीला अटक केली. या व्हिडीओची तूफान चर्चा असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंधेरीच्या परिसरात घडली. लोकलमध्ये एका महिलेच्या सीटवर झोपण्यावरून हा प्रकार घडला आणि वाद झाला. महिलेसोबत वाद झाला आणि तिला शिवीगाळ करत तिच्यावर बेल्ट काढून उगारण्यात आला.

कानाखालीही देण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून हैराण करणारा दावा करण्यात आला. आरोपीचे म्हणणे आहे की, ती महिला नसून ती एक ट्रान्सजेंडर होती. ज्यानंतर पोलिसही चक्रावले. मात्र, आरोपी हा स्वत:चा बचाव करण्यासाठी असे खोटे बोलत असल्याचे स्पष्ट काही वेळातच झाले.

पोलिसांनी तपास केला असता आणि त्या महिलेचा शोध घेतला असता ती ट्रान्सजेंडर नसून महिला असल्याचेच स्पष्ट झाले. ती एक नेपाळी महिला आहे. जीआरपीकडून त्या महिलेचा शोध घेण्यात आला. काही व्हिडीओमध्ये तो व्यक्ती महिलेला मारहाण करतानाही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता महिलेला मारहाण करणाऱ्या या आरोपीवर काय कारवाई होते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!