AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेपरमध्ये फोटो बघताच आचल मामीडवारच्या पायाखालची सरकली जमीन, थेट सक्षम ताटे याची…

Saksham Tate murder case : सक्षम ताटे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आचल हिने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी थेट मागणी केली आहे. सक्षमच्या हत्येच्या दिवशी नेमके काय घडले, हे तिने सांगितले असून मोठा खुलासा केला आहे.

पेपरमध्ये फोटो बघताच आचल मामीडवारच्या पायाखालची सरकली जमीन, थेट सक्षम ताटे याची...
Achal Mamidwar Saksham Tate case
| Updated on: Dec 02, 2025 | 3:28 PM
Share

नांदेडचा सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून सक्षमची हत्या करण्यात आली. अल्पवयीन असताना कुटुंबियांच्या दबावामुळे आणि धमक्यांमुळे एक वर्षांपूर्वी सक्षम विरोधात आचल हिने तक्रारही दाखल केली होती. नंतर स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली. वडील आणि भाऊ दोन नंबरचे धंदे करायचे असाही खुलासा आचल हिने केला. हेच नाही तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सक्षम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होती. घटनेच्या दिवशी देव दर्शनासाठी म्हणून मला नेण्यात आले. सक्षमची हत्या झाली हे माहितीच नव्हते. सक्षमसोबत पळून जायला तयार होते, पण तो माझ्या वडिलांची इज्जत जाईल म्हणून तयार नव्हता .

हेच नाही तर आचल हिने म्हटले की, मी त्याच्यावर किती प्रेम करत होते, हे मला माहिती नाही पण तो माझ्यावर खूप जास्त प्रेम करायचा. तो माझ्या वडिलांसारखे प्रेम माझ्यावर करायचा. तो माझा दुसरा बाप होता. मी त्याला नेहमीच म्हणायचे की, तू माझा दुसरा बाप आहेस .पोलीस कर्मचारी माझ्या भावाला म्हणाला की, तुझ्या बहिणीचे लफडे आहेत त्याला मार, भाऊ बोलला सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवतो.

सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते. सक्षम आमच्या घरी नेहमी यायचा त्यातून तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेम संबंध जुळले. सक्षम आणि मी दोघेही 16 ते 17 वर्षाचे होतो. वर्षभरापूर्वी माझ्या घरच्यांना आमच्याबद्दल माहिती मिळाली. वर्षेभरापूर्वी वडील आणि भावांनी दबाव टाकला. धमक्या दिल्या सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर.. तक्रार दे.. गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या देत होते.

शस्त्रांचा धाक दाखवत होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी अल्पवयीन असताना सक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. मात्र 18 वर्ष पुर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली आणि त्याच गुन्ह्यात सक्षमवर एमपीडीएची कारवाई झाली. तो गुन्हेगार नव्हता.. पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन जात होते.. माझ्या वडील आणि भावांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमवले.

तीन वर्षात मला खूप दबाव टाकला, खूप वेळा मारहाण करण्यात आली. सक्षमला मी सगळं सांगितलं. 27 तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ मला बोलला की, चल सक्षम विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करू. मात्र, मी त्याला नकार दिला. तो माझ्यावर बळजबरी करत होता. पण त्याने बळजबरी करूनही मी तक्रार दिली नाही. सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही.

तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथे येतोस.. तुझ्या बहिणीचे लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये… त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं देव दर्शनालां जायचं. मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊसोबत नव्हते. आई आणि काका काकू होते. आम्ही मानवतला थांबलो आणि तिथे पोलीस आले.

तिथे दोन्हीं भाऊ आणि वडील पण होते.  मला आश्चर्य वाटलं दोन्ही भाऊ आणि वडील का आले..  मला सांगितलं सक्षमला दोन तीन टाके लागले, रुग्णालयात आहे. तिथून पोलिसांनी नांदेडला आणलं. पोलिसांनी सुद्धा काहीच सांगितलं नाही. पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यावर तिथे काही पेपर होते मी सक्षमचा फोटो आणि बातमी बघितली आणि माझ्या लक्षात आले, त्यावेळी मला समजले की, यांनी सक्षमला मारले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.