“जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही”; राहुल गांधी यांच्या कारवाईवरून भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं…

लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष मजबूत पाहिजे.मात्र आता पक्षही मजबूत नाही आणि नेताही मजबूत नाही अशी अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही; राहुल गांधी यांच्या कारवाईवरून भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं...
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 6:45 PM

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदरकी रद्द झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसबरोबरच आता भाजपने ओबीसीचे कार्ड बाहेर काढून ओबीसी समजाचा अपमान झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभर आता आता राहुल गांधी यांच्या समर्थनाथ आणि विरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधून आता राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.

तर आज भाजपचे नेते विनोद तावडे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून राहुल गांधी यांना ते शोभणारं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर राहुल गांधी यांना शिक्षा जाहीर होताच ही कारवाई कायदेशीर कारवाई झाल्याचे सांगत राहुल गांधी यांना झालेली शिक्षा आणि त्यांचे गेलेली खासदारकीचेही विनोद तावडे यांनी समर्थन केले आहे.

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी महाविकास आघाडीला छेडले आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधी नंतर जर सरकार स्थापन झालं असतं तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या भूमिकेवर आणलं असतं.

मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादीची भूमिका सोडून काँग्रेसची भूमिका स्वीकारली.सरकार बनल्यानंतर आपल्या अजेंड्यावर सहकाऱ्यांना आणण महत्वाचं असतं मात्र खुर्चीसाठी फरफटत जाण चांगलं नसतं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदानापासून वंचित ठेवलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय बोलली होती त्याची आता आठवण करून देणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर साऱ्या देशातून भाजपवर टीका केली जात आहे. त्यावर बोलतानाही त्यांनी सांगितले की, मोदी सरकार घटनेप्रमाणे वागत नाही असं एकीकडे बोलायचं,आणि घटनेप्रमाणे आणि कायद्याने कारवाई केली तर हे कसं काय केलं अस दुटप्पीपणाने बोलायचं अशी नीती काँग्रेसची आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

त्यामुळे कोणावरही जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर ओबीसी समाजाचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे.

त्यांना हे शोभत का? माझं आडनाव सावरकर नसून गांधी आहे त्यामुळे मी माफी मागणार नाही….हे राहुल गांधींचे वाक्य कोकणवासीयांना पटणार नाही असंह त्यांनी यावेळी सांगितले.मात्र हे दुर्दैवी आहे.

लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष मजबूत पाहिजे.मात्र आता पक्षही मजबूत नाही आणि नेताही मजबूत नाही अशी अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.