Ladki Bahin Yojana : ठरलं! आता या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, तुमचं तर नाव नाहीना? आदिती तटकरेंचा मोठा निर्णय

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, आशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेबाबत आता आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Ladki Bahin Yojana : ठरलं! आता या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, तुमचं तर नाव नाहीना? आदिती तटकरेंचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 4:48 PM

ज्या कुटुबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात. ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे, ही योजना सुरू करताना काही निकष ठेवण्यात आले होते, मात्र या निकषांचं उल्लंघन करून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे, चक्क सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या तटकरे? 

ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे, त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घेतले, तसेच मिळालेला लाभ पुन्हा दिला. अजूनही अशा महिला ज्या सरकारी नोकरीमध्ये असून देखील या योजनेचा लाभ घेतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, त्यांच्याकडून घेतलेला लाभ हा वसूल केला जाणार आहे, अशी घोषणा यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज्य शासनाने ही योजना आणली याचे नियम आणि निकष सुरुवातीपासून स्पष्ट केलेले आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्या या योजनेपासून केव्हाही वंचित राहणार नाहीत, मात्र ज्या महिला चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे यांच्यावर शासन योग्य ती कारवाई करणार आहे.  लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून या योजनेवर सर्वांचं लक्ष आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवण्याचा आमचा उद्देश असून ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असंही यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.