AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानीची कामे मार्गी लागेपर्यंत आचारसंहिता लागणार नाही; आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक आले होते. यावेळी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांचे प्रथमच दसरा मेळाव्यात भाषण झाले.

अदानीची कामे मार्गी लागेपर्यंत आचारसंहिता लागणार नाही; आदित्य ठाकरेंचा आरोप
| Updated on: Oct 12, 2024 | 7:43 PM
Share

शिवसेना पक्षांची दोन स्वतंत्र दसरा मेळावे आज मुंबईत झाले. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क येथे साजरा झाला. या दसरा मेळाव्यात यंदा प्रथम युवा नेते आदित्य ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आपण प्रथमच शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन बोलत आहोत असे सांगत त्यांनी आपले आजोबा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आदित्य ठाकरे यांनी माझ्या मागे वडीलांचा, आजोबांचा आणि पणजोबांचा आशीवार्द असल्याचे यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की पहिल्यांदा मी दसरा मेळाव्यात भाषण करत आहे. मनात अनेक आठवणी आहेत. लहानपणी दसरा हा मोठा दिवस होता. आज्याचं भाषण असायचं. बाळासाहेबांचं भाषण ऐकायला इथे समोर बसलो आहे. मग वडिलांचं भाषण ऐकायला बसायचो. २०१० मध्ये याच मेळाव्यात युवा सेनेची स्थापना केली. त्यांनी तलवार हातात दिली आणि लढण्याचं बळ दिलं. आदित्य लढ. मातीसाठी लढ, महाराष्ट्रासाठी लढ असे त्यांनी सांगितल्याचे आदित्य म्हणाले. ते पुढे म्हणाले की मी वडिलांचा शपथविधीही पाहिला. भाषण ऐकली आहे. गेल्या १४ वर्षात मी कधी भाषण केलं नाही. वडील आल्यावर मी थांबणार आहे. माझ्या आजोबाचा आणि पणजोबाचा आशीर्वाद आहे. हा क्षण मोठा आहे. ही सर्वात मोठी लढाई असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अदानीचे सर्व कामे होईपर्यंत….

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की ६ जानेवारी रोजी आम्ही अरविंद सावंत यांचा प्रचार सुरू केला. तेव्हा सांगितलं की, लोकसभेत बदल घडवायचं आहे. ते वर्ष आलं आहे. परवा एका अधिकाऱ्याने सांगितलं. चर्चा सुरू आहे. आपण सर्व आमदार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. हे सरकार हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. महामंडळांची खैरात होत आहे. जोपर्यंत अदानीची सर्व कामे आणि जीआर निघणार नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही. एका अधिकाऱ्यानेच आपल्याला सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल