AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांना होमग्राउंडमध्ये डिवचणं भारी पडलं, संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीच हे काय घडलं?

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कोकणातील बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे स्वागताचे बॅनर्ग झळकले. पण शिवसैनिकांच्या या कृतीवरच प्रशासनाने बोट ठेवलंय.

नारायण राणे यांना होमग्राउंडमध्ये डिवचणं भारी पडलं, संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीच हे काय घडलं?
| Edited By: | Updated on: Feb 17, 2023 | 4:52 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कोकणातील बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे स्वागताचे बॅनर्ग झळकले. सिंधुर्गात संजय राऊतांच्या (Sanjay Raut) स्वागताचे बॅनर्स झळकले. इलाका तेरा धमका मेरा अशा आशयाचे बॅनर्स सिंधुदुर्गात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. पण हे बॅनर्स फार काळ राहीले नाही. कारण शिवसैनिकांनी लावलेले बॅनर्स स्थानिक प्रशासनाने लगेच हटवले आहेत.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून संजय राऊत हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेला रवाना झाले आहेत. पण त्यापूर्वीच सिंधुदुर्गातील कणकवलीत एक वेगळा प्रकार बघायला मिळाला.

संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत त्यांच्या स्वागताचे बॅनर चौकात लावण्यात आले होते. पण स्थानिक प्रशासनाने ते बॅनर तिथून हटवले. त्यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झालाय. दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या या कारवाईची कणकवलीत आता चर्चा होऊ लागली आहे.

संजय राऊत सत्तांतरानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात

संजय राऊत हे बऱ्याच दिवसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंप आणि सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्याला येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे.

संजय राऊत मधल्या काळात शंभर दिवस जेलमध्ये देखील होते. याशिवाय शिवसेना पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर घडामोडी घडल्या आहेत. शिवसैनिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप विषयी रोष आहे. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाचा संजय राऊत सारखा बडा नेता आपल्या जिल्ह्यात येत असल्याचा उत्साहच इथला कार्यकर्त्यांमध्ये निराळा आहे.

स्थानिक प्रशासनाने कारवाई का केली?

संजय राऊत यांच्या या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाचा शक्तीप्रदर्शनाचा देखील प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच कणकवलीत त्याची जोरदार तयारी करण्यात आली. इलाका तेरा धमाका मेरा, अशा आशयाचे बॅनर्स कणकवलीत झळकले आहेत. या बॅनर्समुळे कणवलीत शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून हे बॅनर्स काढले आहेत.

संजय राऊत आज रत्नागिरीत येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यांचं मोठ्या जल्लोषात कणकवलीत स्वागत होईल. यावेळी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाईल. त्यानंतर राऊतांची एक सभा होईल. राऊत आज सिंधुदुर्गात मुक्कामाला थांबतील. त्यांच्या हस्ते उद्या काही शाखांचं उद्घाटन होईल, तसेच ते शिवसेनेच्या शाखांना भेटी देतील, नंतर ते पत्रकार परिषद घेतील.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.