AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंना जबर धक्का, ठाकरे गट अडचणीत, दिल्लीतून खळबळजनक अपडेट समोर!

जुन्या संसदभवनात ठाकरे यांच्या पक्षाला 128 A क्रमांकाचे कार्यालय मिळालेले होते. परंतु ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची अगोदरची संख्या लोकसभेत नऊ आणि राज्यसभेत दोन अशी होती. पण आता ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या फक्त 4 राहिली आहे.

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंना जबर धक्का, ठाकरे गट अडचणीत, दिल्लीतून खळबळजनक अपडेट समोर!
uddhav thackeray party officeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 3:10 PM
Share

Uddhav Thackeray UBT Party Office : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची एकूण संख्या कमी झाली आहे. तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणखी बळकट झाला आहे. एकदाच सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. याचा परिणाम कदाचित आगामी निवडणुकीत होऊ शकतो. या धक्क्यातून सावरण्यासाठी तसेच पक्षात पुन्हा उर्जा पेरण्यासाठी उद्धव ठाकरे बंडखोर खासदरांच्या मतदारसंघांचे दौरे करत आहेत. असे असतानाच आता ठाकरे यांना थेट दिल्लीतून आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता ठाकरे यांचे लोकसभेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्याचा फटका ठाकरे यांना बसू शकतो. ठाकरे यांचे जुन्या संसदभवनातील कार्यालय लोकसभा सचिवालय परत घेऊ शकते. ही कारवाई झाली तर दिल्लीमध्ये ठाकरे यांचे संसदेतर्फे दिले जाणारे कार्यालय नसेल. हा निर्णय झालाच तर ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा फटका असू शकतो.

नेमका नियम काय आहे?

जुन्या संसदभवनात ठाकरे यांच्या पक्षाला 128 A क्रमांकाचे कार्यालय मिळालेले होते. परंतु ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची अगोदरची संख्या लोकसभेत नऊ आणि राज्यसभेत दोन अशी होती. पण आता ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या फक्त 4 राहिली आहे. संसदेच्या नियमानुसार संसदेमध्ये कोणत्याही पक्षाला कार्यालय हवे असेल तर संबंधित पक्षाचे पाच पेक्षा जास्त खासदार असणे आवश्यक असते. हाच मुद्दा उपस्थित करून लोकसभा सचिवालयाने ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतला तर ठाकरे यांचे संसदेतील कार्यालय जाऊ शकते.

या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभा सचिवालयाकडे असतो. त्यामुळे लोकसभा सचिवालय यावर नेमका काय निर्णय घेते? असा निर्णय झालाच तर ठाकरे यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!