AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझे 900 रुपये मला परत द्या; मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटताच समीर कुलकर्णी यांची मागणी; काय घडलं होतं नेमकं?

मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

माझे 900 रुपये मला परत द्या; मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटताच समीर कुलकर्णी यांची मागणी; काय घडलं होतं नेमकं?
SameerImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 31, 2025 | 12:38 PM
Share

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनी निकाल आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, समीर कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीने सर्वांचे लवक्ष वेधले आहे.

माझे 900 रुपये मला परत द्या

मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून 900 रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर साडेसातशे रुपये दाखवले. ते 900 रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीयेअसे म्हटले. समीर कुलकर्णी असे म्हणताच कोर्टाने यावर उत्तर दिले आहे. कोणताही मुद्देमाल परत देण्याचा कोर्टाचा आदेश नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खूनी कधी पाहिला नसेल

निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केला आनंद

याप्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मी आनंदी आहे कोर्टाच्या या निर्णयाने आमच्यावरचा डाग पुसला असे रमेश उपाध्याय यांनी म्हटले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिली प्रतिक्रिया

जेव्हा हा खटला दाखल करण्यात आला तेव्हाच राज्य, देशामध्ये या विषयावर चर्चा झाली. काही निरपराध लोकांना गोण्याच्या प्रयत्न होत नाही ना? या खटल्यामध्ये काय राजकारण तर होत नाही ना? अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आज जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तरी यामध्ये तेव्हाच्या संदेह व्यक्त केला. त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं. निर्दोष मुक्तता महामही न्यायाधीशांनी करणे व पुरावे जर त्यावेळेस सरकारने दिले असते तर गुन्हेगार कधी सुटले नसते आणि या माध्यमातून तेव्हाच्या शंका खरं ठरल्याअसे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा