Nitesh Rane: आमच्या घरापर्यंत आले, आता मातोश्रीची दोनची बारी; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंना धमकी?
Nitesh Rane: भाजप मंत्री नितेश राणी यांनी काल मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज थेट उद्धव ठाकरे यांना मातोश्री दोनवरुन धमकी दिल्याचे समोर आले आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा...

देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. राज्यातील 29 पैकी 25 जागांवर महायूतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे बंधूंना हा सर्वात मोठा पराभव असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप मंत्री नितेश राणी यांनी हसतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर आज नितेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना धमकी दिल्याचे दिसत आहेत.
नितेश राणेंची मातोश्री दोन वरुन धमकी
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा...
प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मुंबईतील 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता महायुतीने उठवून लावली. तुमची कालची प्रतिक्रिया देखील व्हायरल झाली त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाही, जे काही उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरे तोडणे, विरोधकांची घरे उद्धवस्त करणे, कारणवाया करणे यासाठी वापरली. मला आठवतं ज्यावेळी हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिका आयुक्ताला फोन करुन राणे का घर तोडो, राणे का घर तोडो,.. आणि म्हणूनच मी खास प्रतिक्रिया त्याला दिली. जेणेकरुन त्याला आठवणीत राहील. राणे का घर तो तोडा नही, अभी तेरे मातोश्री दो की बारी है” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महापौर विषयी काय म्हणाले?
“निवडणुकीच्या प्रचाराच्या आगोदर पासून बोलत होतो की मुंबईमध्ये आय लव्ह महादेव आणि जय श्रीराम विचारांचा हिंदू मराठी आणि महायूतीचाच महापौर बसेल. हे आम्ही वारंवार बोलत होतो तसच मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. महायूतीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आता जय श्रीराम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर, महापौरच्या खूर्चीवर बसू” असे नितेश राणे पुढे म्हणाले.
काय होता नितेश राणेंचा व्हिडीओ?
व्हिडीओमध्ये नितेश राणे जोरजोरात हसताना दिसत होते. जवळपास 22 सेकंद नितेश राणे हे हसत होते. उद्धवजी आणि पेंग्विन ला… जय श्री राम! असे नितेश राणे व्हिडीओमध्ये बोलताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठी असल्याचे म्हटले जात होते.
