AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव, नागपुरात सोने, चांदीचे घबाड जप्त, सोन्याची किंमत…गुजरातच्या कंपनीकडून आणले गेले होते सोने

जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली. दोन दिवसांत १०० कोटींचे सोने, चांदी मुंबई, नागपूर आणि जळगावत जप्त करण्यात आले आहे.

जळगाव, नागपुरात सोने, चांदीचे घबाड जप्त, सोन्याची किंमत...गुजरातच्या कंपनीकडून आणले गेले होते सोने
gold (file Photo)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 17, 2024 | 10:29 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता एक दिवस राहिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे पथक अधिकच सक्रीय झाले आहे. शनिवारी मुंबईत 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. नागपुरात जप्त केलेल्या सोन्या चांदीची किंमत 14 कोटी तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत पाच कोटी 59 लाख 61 रुपये आहे. यामुळे दोनच दिवसांत 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे सोने, चांदी जप्त करण्यात आले आहे.

नागपुरात नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई

नागपुरात तब्बल 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली आहे. हा सर्व मुद्देमाल एकूण 14 कोटी रुपयांचा आहे. नागपूर विद्यापीठ समोरील रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना गुजरातमधील “सिक्वेल लॉजिस्टिक्स” या पुरवठा कंपनीची गाडी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेच्या पथकाने थांबवली. त्यावेळी व्हॅनमध्ये 17 किलो सोने दागिने स्वरूपात आणि 55 किलो चांदी प्लेट्स स्वरूपात आढळली.

सोने-चांदी विदर्भातील सराफांचे

सोने व चांदी विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डरनुसार त्यांच्या प्रतिष्ठानात पुरवठ्यासाठी नेले जात होते. त्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिक या दागिने वाहतूक करणाऱ्या कंपनीची सेवा घेण्यात आली होती. हे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स नागपूरसह अकोला, अमरावती अशा विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील सराफा व्यवसायिकांनी ऑर्डर स्वरूपात बोलावल्याची माहिती आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे, बिल सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे होते. मात्र आचारसंहितेच्या काळात लागणारी परवानगी त्या कंपनीकडे नव्हती. त्यामुळे तपासणी पथकाने संबंधित सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स जप्त केल्या आहेत. त्या संदर्भात आयकर विभाग तसेच जीएसटी विभागालाही सूचना देण्यात आली आहे.

जळगावात सहा कोटींचे दागिने जप्त

जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालमध्ये चार किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. या ऐवजाचा पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी इन कॅमेरा संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्रे वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा…

ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी