AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhondu Ashok Kharat Case : माझी त्यांना विनंती आहे खऱ्या असाल तर..सुषमा अंधारे रुपाली चाकणकरांबद्दल काय बोलल्या?

Bhondu Ashok Kharat Case : "आतापर्यंत एका महिला आयोगाच्या अध्यक्षाला एवढी ग्लोरी, ग्लॅमर पॉलिटिकल हेवीवेट आलं नव्हतं. हे अचानक यांना कसं काय आलं? एकाही महिला आयोगाच्या अध्यक्षाने लेटरहेडवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असं स्तोम माजवलं नव्हतं"

Bhondu Ashok Kharat Case : माझी त्यांना विनंती आहे खऱ्या असाल तर..सुषमा अंधारे रुपाली चाकणकरांबद्दल काय बोलल्या?
Bhondu Ashok Kharat Case
| Updated on: Mar 21, 2026 | 9:23 AM
Share

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. त्यावर आता हे प्रकरण उचलून धरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एवढी टीका टिप्पणी होईपर्यंत, मुख्यमंत्र्यांनी आदेश काढेपर्यंत ते वैयक्तिक कारण दिसलं नाही’ असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “त्यांना अटक करा ही आजही माझी मागणी आहे. चाकणकरांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली. मला त्यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट नाही. त्यांना सहआरोपी करा. कारण गुन्ह्याच्या कटकारस्थाचा भाग त्यांना माहित होता. तरीही त्यांनी गुन्हेगाराची मदत केली” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

“कालही त्या म्हणाल्या. हा मला फोन आला होता. व्हिडिओ दाखवला होता. याचा अर्थ तुम्हाला सर्व माहित होतं. तुम्ही अवेअर होता. तरीही तुम्ही पीडितेला न्याय देण्याऐवजी ज्याने शोषण केलं त्याची बाजू घेतली. ही चूक नाही गुन्हा आहे. पत्रकाराला धमकावलं. पदाचा गैरवापर केलात” असे आरोप अंधारे यांनी केलेत.

अर्थात त्यांना तटकरेंचा आशिर्वाद होता

“आतापर्यंत एका महिला आयोगाच्या अध्यक्षाला एवढी ग्लोरी, ग्लॅमर पॉलिटिकल हेवीवेट आलं नव्हतं. हे अचानक यांना कसं काय आलं? एकाही महिला आयोगाच्या अध्यक्षाने लेटरहेडवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असं स्तोम माजवलं नव्हतं. एकाही आयोगाच्या अध्यक्षाने अशा पद्धतीने पत्रकार परिषदां घेणं. लुडबूड करणं, खरंतर त्या आमदारही नाहीत. विधिमंडळात त्यांचा वावर होता. अर्थात त्यांना तटकरेंचा आशिर्वाद होता. हे सर्व अत्यंत गलिच्छपणाचं आहे. मी म्हटलं त्यांना अटक करा, त्यांची नार्को करा. नार्को करणं यासाठी गरजेचं आहे कारण त्यांनी पीडितेला न्याय देण्याऐवजी, ज्याने शोषण केलं त्याची बाजू घेतली” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

तारखांमध्ये खाडाखोड केलीय का?

फोटो दाखवताना तारखांमध्ये खाडाखोड केल्याचं त्याचं म्हणणं आहे. “माझी त्यांना विनंती आहे खऱ्या असाल तर पोस्ट डिलिट करु नका. मूळात मी, 12 तारखेची पोस्ट आहे ती कुठेही खोडलेली नाही. ती तशीच आहे. 2 तारखेचा फोटो मी दाखवलेलाच नाही. यातच खर गंमत आहे, 2 तारीख हे त्यांनी मान्य केलं. मी तुम्हाला फोटो 12 आणि 9 तारखेचा दाखवला.9 सप्टेंबर 2024 ची जखम दिसतेय . ती 28 डिसेंबर 2024 पर्यंत दिसते चार महिने जखम दिसतेय” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी