AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : भोंदूबाबा प्रकरणात महाराष्ट्रातला हा नेता रुपाली चाकणकर यांच्या पाठिशी उभा राहिला, समर्थन करताना बोलला की..VIDEO

Rupali Chakankar : "जे काही चित्र समोर दिसतय हे रुपाली चाकणकर यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे. कुणालाही राजकारणात अशा पद्धतीने बदनाम करुन घालवू नये हीच आमची भूमिका आहे. काँग्रेसने हे सोसलं आहे"

Rupali Chakankar : भोंदूबाबा प्रकरणात महाराष्ट्रातला हा नेता रुपाली चाकणकर यांच्या पाठिशी उभा राहिला, समर्थन करताना बोलला की..VIDEO
Rupali Chakankar
| Updated on: Mar 21, 2026 | 8:39 AM
Share

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. सध्या सगळ्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा आहे. कोट्यावधीची संपत्ती जमवल्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा या भोंदूबाबा अशोक खरातवर आरोप आहे. रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकारे तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.

रुपाली चाकणकर यांनी राजकीय कारकिर्द या प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. या खडतर काळात पुणे काँग्रेसमधील नेते अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांना पाठिंबा दिला आहे. “नाशिकच्या खरातच जे प्रकरण आम्हाला दिसतय. त्यामध्ये खरातवर कारवाई झाली पाहिजे. अशा व्यक्तीला बाहेर सोडलाच नाही पाहिजे ही आमची पहिली भूमिका आहे. पण खरातला बाजूला ठेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर जो निशाणा साधला जातोय. यात स्पष्टपणे राजकीय गणित दिसत आहेत” असं अरविंद शिंदे म्हणाले.

पोलीस डोळे बंद करुन होते का?

“रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना दखल घेतली नसेल, कामात कुचराई केली असेल तर त्यावर बोलले पाहिजे. ज्यावेळेला तक्रारी दाखल झाल्या, त्यावेळी बोललं पाहिजे होतं. आज खरातला जे धरलं आहे. खरातचं जे षडयंत्र चालू आहे, पोलीस डोळे बंद करुन होते का?” असा सवाल अरविंद शिंदे यांनी विचारला आहे.

खरात चुकीचा असेल कडक कारवाई करा

“नाशिकमध्ये खरात विरोधात पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावेळी पोलिसांनी, एलआयबी, साीआयडीने काही केलं नाही. म्हणून यात राजकारण करु नका. खरात चुकीचा असेल कडक कारवाई करा. रुपाली चाकणकर त्यांच्या कार्यकाळात कुणाला राजकारणात अशा पद्धतीने बदनाम करुन राजकारणत उठवू नये अशी आमची भूमिका आहे” असं अरविंद शिंदे म्हणाले.

त्यावेळी गप्प का बसले?

“आरोप आहे तथ्य नाही. आरोप ज्यावेळी आपण करतो तक्रार दाखल झाली त्यांनी त्यावर कारवाई केली नाही. मग त्यावेळी आंदोलन का नाही केलं?. त्यावेळी पत्रकार परिषद का नाही घेतली? त्यावेळी गप्प का बसले? खरे सूत्रधार पोलीस खातं आहे. कोट्यवधीच्या जमिनी खरेदी केल्याचे सातबारे आम्ही पाहिले. पोलीस खातं, महसूल खातं सगळे गप्प आहेत” अशी टीका अरविंद शिंदे यांनी केली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!