AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोकाटे?

नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषीमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोकाटे?
| Updated on: Apr 06, 2025 | 9:13 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला आहे. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहाणी दौरा कृषीमंत्र्यांकडून सुरू आहे. दरम्यान नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंदी पडतील असं काही होणार नाही, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार सर्वांना बरोबरीनं घेऊन चाललं आहे. सर्वांना न्याय देणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाहीये. राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे, यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाहीये. भविष्यातील काळ हा विरोधकांसाठी अवघड आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान वक्फ सुधारना विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे.  मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनीवर सरकारचं लक्ष असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

विरोधकांच्या या टीकेला देखील यावेळी माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षांच्या लोकांकडे काही काम उरलेलं नाही, त्यामुळे ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जमिनीचा विषय काढत आहेत. दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम विरोधक करत आहेत, असं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा