कृषिमंत्री म्हणतायत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे भुसे यांच्या घरासमोर आंदोलन

कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचा दावा केला.

कृषिमंत्री म्हणतायत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर विम्यासाठी 'स्वाभिमानी'चे भुसे यांच्या घरासमोर आंदोलन
दादा भुसे, कृषिमंत्री.
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 2:37 PM

मालेगावः एकीकडे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचा दावा केला, तर दुसरीकडे आजच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भुसे यांच्या घरासमोर पीकविम्यासाठी आंदोलन केले.

यंदा राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले. लाखो हेक्टरवरील पीकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास काढून घेतला गेला. आज गुरुवारी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी 4 हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खातात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. त्यांनी आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गावातील घरासमोर पीकविम्या व मदतीच्या मागणीसाठी आंदोलन केले.

कृषिमंत्री-आंदोलक यांच्यात चर्चा

राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ‘कडू’  होत असतांना मंत्र्यांची दिवाळी ‘गोड ‘ होऊ द्यायची नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी स्टंटबाजी आंदोलन न करता चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू अशी हात जोडून विनंती केली. मात्र, आंदोलकांनी ‘स्टंटबाजी’ या शब्दावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होतील, असे आश्वासन यावेळी भुसे यांनी दिले.

जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टर पीक पाण्यात

यंदा अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यात यावर्षी अक्षरशः थैमान घातले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. मालेगाव, मनमाडमध्ये दोन-दोनदा पुराचे तडाखे बसले. त्यात सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ पीक उद्धवस्त झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे. या नुकसानीचे आकडे भयावह आहेत. जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवरचे पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी मदत म्हणून 8957.01 लाखांची मागणी करण्यात आली आहे. बागायत पिकासाठी 4367.98 लाखांच्या निधीची मागणी केली आहे. वार्षिक फळपिकांसाठी 18.35 लाख, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 1377.99 लाखांची अशी एकूण 147 कोटी 21 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. (Agriculture Minister says more than Rs 4,000 crore deposited in farmers’ accounts, Swabhimani Shetkari Sanghatana’s agitation in front of Dada Bhuse’s house)

इतर बातम्याः

Nashik Gold: सुखाचे दीप उजळू दे, सोनं-चांदी अजूनही स्वस्तय बरं!

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.