
जेजुरी : (Gopichand Padalkar) आ. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातील शाब्दिक चकमक हा काही नवीन विषय नाही. आज (Ahilyabai Holkar) अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिवशीही त्यांनी (Rashtrawadi Party) राष्ट्रवादी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. जातीयवादी लोकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्यामुळे पुतळ्याला दुग्धभिषेक घालून शुध्दीकरण केले असल्याची जहरी टिका त्यांनी राष्ट्रवादीवर केली. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुतळा अनावरण केल्यानंतर त्यांनी ही टिका केली आहे.आज चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव असून उत्सवाच्या दिशेने रवाना होत असताना त्यांनी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टिका केली. यावेळी सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.
अहिल्याबाई पुतळ्याचे अनावरण यावरुन मध्यंतरी आ. पडळकर आणि राष्ट्रवादी पक्षात राजकीय कलगीतुरा निर्माण झाला होता. दरम्यान आज अहिल्याबाई यांचा जयंती उत्सवाचे निमित्त साधत या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात आला आहे. जातीयवादी लोकांनी मध्यंतरी पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यामुळे आज जयंतीच्या उत्सवाचे निमित्त साधत दुग्धभिषेक घालण्याचा योग आला आहे. यापेक्षा चांगले मुहूर्त असूच शकत नाही म्हणत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा टार्गेट केले. जयंती उत्सवाला मार्गस्थ होत असताना त्यांनी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेतले.
राष्ट्रवादी हा जातीय पक्ष असून आतापर्यंत केवळ जातीय राजकारण करण्यातच या पक्षाने धन्यता मानली आहे. आता पुतळा आणवरानंतर चौंडीवर कब्जा करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नसल्याचे सांगून सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादीवर टिका केली आहे. सध्या राज्यात जातीभेद करण्यामध्ये राष्ट्रवादीकडून खतपाणी घातले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हाच प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून केला जात आहे.
नव्या मोहिमेची सुरवात ही खंडेरायाच्या दर्शनाने केली जाते. यंदा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात एक नवी मोहिम सुरु केली जाणार आहे. जातीय निर्मूलनाची मोहिम हाती घेण्यासाठीच चौडीला जात असल्याचे सांगत पडळकर यांनी नवी राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.