AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री अग्नितांडव; दोन चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंब झोपेतच संपलं,नक्की काय घडलं?

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाट्यावरील कालिका फर्निचर नावाच्या दुकानात भीषण आग लागून रासने कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन लहान मुले, आई-वडील आणि एक वृद्ध महिला ठार झाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मध्यरात्री अग्नितांडव; दोन चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंब झोपेतच संपलं,नक्की काय घडलं?
ahilyanagar fire
| Updated on: Aug 18, 2025 | 11:34 AM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरलं आहे.

नेमकं काय घडले?

अहिल्यानगर परिसरातील नेवासा फाटा या ठिकाणी कालिका फर्निचर नावाचे फर्निचरचे दुकान आहे. हे दुकान सुमारे ५००० चौरस फूट क्षेत्रफळावर वसलेले आहे. या दुकानात काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानात लाकडी फर्निचर होते. तसेच कूलर, फ्रीज, सोफा, दिवान, खुर्ची, शोकेस आणि वॉशिंग मशीन यासारख्या काही वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. यामुळे आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. यानंतर दुकानात सर्वत्र आगीच्या धुराचे लोळ आणि ज्वाळा पाहायला मिळाल्या.

अहिल्यानगरमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर रासने कुटुंब वास्तव्यास होते. रात्रीच्या गाढ झोपेत असताना आग लागल्याने हा धूर घरात पसरला. या धूरात श्वास कोंडल्याने कुटुंबातील पाच सदस्यांचा जागेवरच गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), अंश मयूर रासने (१०) आणि चैतन्य मयूर रासने (७) आणि एक वृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेत आई-वडील, दोन लहान मुले आणि वृद्ध आजी अशा पाच जीवांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तातडीने मदतकार्य

दरम्यान या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्घटनेतून मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांची आई बचावली आहे. कारण ते मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. याशिवाय, यश किरण रासने (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सखोल तपास सुरु

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नेवासा परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.