अहमदनगरमध्ये चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जालन्यात पाच मुली तलावात बुडाल्या

अहमदनगरमधील बाबूर्डी गावात चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला (Ahmadnagar 4 child death and jalna 5 girl died due drowning)  आहे.

  • जालन्यातून गणेश जाधवसह, कुणाल जयकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 20:40 PM, 23 Jun 2020
अहमदनगरमध्ये चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जालन्यात पाच मुली तलावात बुडाल्या

अहमदनगर/ जालना : अहमदनगरमधील बाबूर्डी गावात चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे जालन्यात तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे दोन्ही परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ahmadnagar 4 child death and jalna 5 girl died due drowning)

अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी गावात चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी येथे एक गुऱ्हाळवर उत्तरप्रदेश मधील मजूर आले होते. हे मजूर झोपलेले असताना चार भावंडे बाबूर्डीतील शेततळ्यात गेले.

मात्र पाण्यात उतरल्यानंतर त्यांना परत वर येता आले नाही. त्यामुळे या चारही भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. महंमद अरबाज (21), महंमद फैजल (20), महंमद दानिश (13) आणि महंमद नावजीस (9) अशी या चार मुलांची नावे आहेत.

दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र एकाच कुटुंबातील 4 भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

जालन्यात तलावात बुडून 5 मुलींचा मृत्यू

तर दुसरीकडे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील तळेगावाडीजवळील तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झाला आहे. या पाचही मुली तलावाशेजारी खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या पाचही मुलींचे मृतदेह गावकऱ्यांनी बाहेर काढले. दरम्यान अद्याप या पाच मुलींची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Ahmadnagar 4 child death and jalna 5 girl died due drowning)

संबंधित बातम्या : 

इंजिनिअरींगचे सहा विद्यार्थी पोहण्यासाठी लळिंग धबधब्यावर, तिघांचा बुडून मृत्यू

दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप