Ahmednagar | जमिनीला भेगा पडल्यानं एकच घबराट! भूगर्भातील हालचालींमुळे बोरबन गावातील जमिनीला भेगा?

Ahmednagar | जमिनीला भेगा पडल्यानं एकच घबराट! भूगर्भातील हालचालींमुळे बोरबन गावातील जमिनीला भेगा?
जमिनीला भेगा नेमक्या कशामुळे पडल्या?
Image Credit source: TV9 Marathi

Cracks on Land : सुरुवातीला थोडीशीच असणारी जमिनीची भेग वाढत चालल्यानं लोक भयभीत झाले आहे. याबाबत गावातील लोकांनी सरपंचांसह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनाही माहिती दिली आहे.

कुणाल जायकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 30, 2022 | 3:30 PM

अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील (Sangmaner Taluka, Ahmednagar) एका गावात खळबळ उडाली आहे. गावातील जमिनीला भेगा (Cracks on Land) पडल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर जमिनीला पडलेल्या भेगा वाढत चालल्यानं लोकांमध्ये भीती पसरली आहे. नेमका हा सगळा प्रकार काय आहे, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे. सुरुवातीला थोडीशीच असणारी जमिनीची भेग वाढत चालल्यानं लोक भयभीत (Scary) झालेत. याबाबत गावातील लोकांनी सरपंचांसह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनाही माहिती दिली आहे. भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत की काय, असा प्रश्न स्थानिक गावकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कुपनलिकेचं पाणीदेखील आटलं आहे. एकूणच आता गावातील लोकांनी नेमका हा सगळा काय प्रकार आहे, याबाबत प्रशासनाकडेही विचारणा केली असून तातडीनं योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशीही मागणी केली जाते आहे.

संगमनेच्या बोरबन गाव भयभीत…

संगमनेर तालुक्यात बोरबन गावात हा सगळा प्रकार पाहून गावकरी भयभीत झाले आहे. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार गावातील लोकांच्या निदर्शनास आला. यानंतर गावातील लोकांनी फोन करुन या संपूर्ण प्रकाराची माहिती संरपंच आणि इतर प्रशासकीय यंत्रणा दिली.

भेगा अडीचशे फूट खोल!

दरम्यान, सरपंचांनी माहिती मिळाल्यानंतर पाहणी केली. या पाहणीनंतर सरपंचांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, की..

सकाळी रहिवाशांनी सांगितलं, की जमिनीला पाच दे दहा फूट भेगा पडल्याचं कळवलं. त्यानंतर येऊन पाहणी केली आहे. येऊन पाहिल्यानंतर ही भेट तब्बल दोनशे ते अडीचशे फूट खोल असल्याचं निदर्शनास आलं आहे. आता याबाबत संबंधित यंत्रणाला माहिती देण्यात आली आहे. त्यांनी तातडीनं यावर योग्य त्या उपाययोजना करण्याची तरतूद करावी.

बोरबन गावातील टेकडवाडी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. पठार भागात आणि परिसरात याआधी भूकंपाचे सौप्य धक्के जाणवले होते. त्यानंतर आता जमिनीला भेगा पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर बोरबन गावातील नागरीक घाबरले आहेत. भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीला भेगा पडत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.

इतर बातम्या :

आनंदाची बातमी ! पुणे महानगरपालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण

पाहा Video : कोल्हापुरातील जत्रेची खास बातमी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें