AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चेतून प्रश्न मिटतील, पण सांगलीच्या जागेसाठी आम्ही…; बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान

Congress Leader Balasaheb Thorat on Mahavikas Aghadi Loksabha Election 2024 : जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?; बाळासाहेब थोरात काय म्हणाले? अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते काय बोलले? वाचा सविस्तर...

चर्चेतून प्रश्न मिटतील, पण सांगलीच्या जागेसाठी आम्ही...; बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 24, 2024 | 3:53 PM
Share

देशात लोकसभा निवडणूक होतेय. अशात राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं. तसंच सांगलीच्या जागेवरबही त्यांनी दावा सांगितला आहे. फक्त महाविकास आघाडीत नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा… तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. चर्चेतून प्रश्न मिटतील. पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत, असं थोरातांनी स्पष्ट केलं. ते अहमदनगरमधील शिर्डीत बोलत होते.

वंचितला सोबत घेणार का?

प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडलेले नाहीत. चर्चा सुरू असून वरिष्ठ मार्ग काढतील. वंचित महाविकास आघाडीत दिसावी अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात आघाडीला आणि देशात इंडियाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अपेक्षा वाढणे साहजिक आहे. या सर्वातून लवकर मार्ग निघेल, असं म्हणत थोरातांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावर प्रतिक्रिया दिली.

निलेश लंके यांच्या उमेदवारीवर थोरात काय म्हणाले?

अजित पवार गटाचे नेते, आमदार निलेश लंके हे निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटात येतील आणि लोकसभा निवडणूक लढतील, अशी दाट शक्यता आहे. त्यावर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली. निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहोत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. निलेश लंके उभे राहतील आणि विजयी होतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मनसे- भाजप युतीवर थोरात म्हणाले…

मनसे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा दोन्ही पक्षांमध्ये सुरु आहे. त्यावर थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचे आणि लावरे व्हीडिओचे सर्वांनाचं कौतुक होते. मात्र ते राज ठाकरे आता दिसत नाहीत. ते महायुतीत गेले तर जनतेत त्यांचा प्रभाव ओसरलेला दिसेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राजकारणासाठी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील महायुती सरकार अपयशी ठरलं आहे. भ्रष्टाचार आणि अशांतता वाढली आहे. मात्र जनता याला नक्की उत्तर देईल, असं थोरातांनी म्हटलं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!