
आज सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडली. मनोज जरांगे, मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्याना सुचवल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या याच विधानाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. एकत्र बसण्याची गरज काय? सरकारला माहिती आऱक्षण कसं द्यायचं ते देत नाहीत. चर्चा करून हा नाही तो नाही आला, मग ढकलाढकली कधीपर्यंत करायची. चर्चेला बसण्याची गरज काय आहे?, असं मनोज जरांगे म्हणालेत.
अहमदनगर जिल्ह्यातील मराठा ताकदीनं एकत्र आला आहे. मराठा समजाचे मनापासून आभार… छगन भुजबळ गप्प बसणार नाही. देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांना बोलायला लावणारच आहे. नारायण राणे आणि मराठा आमदारांची इच्छा बोलायची नसते. पण देवेंद्र फडणवीस कोणालाही गप्प बसून देत नाही. 29 तारखेला मराठे विधानसभेला उभं राहीयाचं की नाही हे ठरवतील. मी कुणालाही भेट असतो. माझ्याकडे कुणी आलं तरी मी भेट असतो, असं म्हणत मनोज जरांगेंनी निलेश घायवळला भेटल्यावर खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बोलताना मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तेढ प्रसंगावर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा सर्वपक्षीय बैठक घेण्याबाबत सुचवल्याचं ते म्हणाले.
आरक्षणाच्या प्रश्नावर एकदा सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे. आम्हीही विरोधी पक्ष म्हणून हजर राहू, असं मुख्यमंत्र्यांनी मी सूचवल्याचं केरे यांना सांगितलं. पण त्यांना वाटतात त्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलावतात. मनोज जरांगे यांना बैठकीला बोलवावं. त्याशिवाय ओबीसी नेत्यांनाही बैठकीला बोलावलं पाहिजे. त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून मार्ग काढूयात, असं शरद पवार आज सकाळी पुण्यात म्हणाले. त्यावर मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय.