AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती लोकं मूर्ख, त्यांची कीव करावी वाटते’, अजित पवार ‘त्या’ व्हिडीओवर संतापले

"आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाहीत. आम्ही दाटी आणि गर्दीने सर्वांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी विरोधकांकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडीओवर दिली.

'ती लोकं मूर्ख, त्यांची कीव करावी वाटते', अजित पवार 'त्या' व्हिडीओवर संतापले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 18, 2024 | 3:52 PM
Share

वर्धा | 18 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास करताना एक व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात आलाय. या व्हिडीओत मुख्यमंत्री वगळता इतर चार नेते हे अत्यंत दाटीवाटीने बसलेले बघायला मिळत आहेत. याच दाटीवाटीवरुन विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातोय. या व्हायरल व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहेत. तसेच संबंधित व्हिडीओ जे व्हायरल करत आहेत त्यांची आपल्याला कीव येत असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

“इतके मूर्ख लोकं आहेत, म्हणजे ज्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केलाय ते. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीत कुणी बसायचं, काय बसायचं ते सगळं चेक केलेलं असतं. गाडीत पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ड्रायव्हर होता. मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. पण आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना डोळ्याजवळ जखम झालीय. तुम्ही अजूनही बघा. त्यांना तिथे गाडी राहिली नाही. सर्व ताफा एकदम निघाला. मी त्यांना म्हटलं या, पुढे थोडसं जायचं आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

‘आम्ही सर्वांना सामावून घेऊन जाणारी माणसं’

“आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाहीत. आम्ही दाटी आणि गर्दीने सर्वांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही”, असं अजित पवार ठणकावून म्हणाले. “असं झालं असतं की आम्ही दोघं बसलो आणि तिसरा दार उघडा म्हणतोय आणि आम्ही जागा असताना त्याला घेत नाही, असं काही झालेलं नव्हतं. पुढे बाकीच्या गाड्या होत्या. तिथे ते उतरले आणि आम्ही गेलो”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“दुर्देवाने जे काही त्याचा क्लिपा फिरवतंय आणि आणखी काही करतंय, मला त्यांची कीव करावी करावी वाटतेय. अरे विकासाचं बोलू ना आपण, गाडीत किंती कोंबले किंवा किती काय केलं, जे गाडीत बसले आहेत त्यांना त्रास होईल. यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे. आम्ही चौघं दाटीवाटीने बसलो, गर्दीचा त्रास होईल ते आमचं आम्ही बघू. आमच्या काही जवळच्यांनीच तो व्हिडीओ मनावर घेतलेला आहे. त्यांना शुभेच्छा”, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?