सत्तेतील लोक वाचवत आहेत… अजित पवार विमान अपघाताबद्दल रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर थेट गंभीर आरोप केली जात आहेत. आता रोहित पवार यांनी काही लोकांवर थेट आरोप केली आहेत. व्हिएसआर कंपनीवर नक्की कारवाई का केली जात नाही, याबाबत बोलताना रोहित पवार दिसले आहेत.

सत्तेतील लोक वाचवत आहेत... अजित पवार विमान अपघाताबद्दल रोहित पवार यांचा खळबळजनक दावा
MLA Rohit Pawar
| Updated on: Feb 18, 2026 | 2:06 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. आता त्यामध्येच आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का केली जात नाही? यावर रोहित पवार बोलले. राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत, कारण त्यांचे काही संबंध आहेत. अजित पवार सत्तेत होते राज्यातील मोठे नेते होते. मात्र, तरीही राज्यातील सत्ताधारी शांत आहेत. सत्तेचा वापर करून करा ना चौकशी. द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचे कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे. दोन दिवसात रिपोर्ट आला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

15 फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट द्यायचा होता. नाही दिला. आज 18 तारीख आहे. रोहित सिंग नावाचा व्हिके सिंगचा मुलगा आहे. या रोहित सिंगचे लग्न दीड दोन वर्षापूर्व मॅरिएटला झाले राजस्थानला. कोण कोण होतं तिथे. लग्नाला घातपात करणारे गेले होते. हे माझे म्हणणे नाही. का चौकशी होत नाही. त्याचे कारण सत्तेतील काही लोक, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे गेले होते.

मग व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता. आज व्हिएसआरवर कारवाई करायची असते. तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहे. का इतर राज्याचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत.

व्हिएसआर कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे स्पष्ट शब्दात रोहित पवार यांनी म्हटले. यासोबतच काही लोकांना मुद्द्याम माहिती पुरवी जात आहे. रोहित पवार यांनी दावा करत म्हटले आहे की, कुणी ब्लॅकमेल करून पायलटला हे करायला सांगितले का? हा आमचा संशय आहे. कारण पायलट काही अडचणीत होता, कितीतरी वर्ष त्याच्याकडे नोकरी नव्हती. व्हिएसआर कंपनीने त्याला अत्यंत कमी पगारात नोकरीला ठेवले होते.