Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या प्रायवेट चार्टर फ्लाईटमध्ये असलेल्या पिंकी माळी कोण? त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसशी काय कनेक्शन?

Ajit Pawar Plane Crash : विमानाने लँडिंग दरम्यान रनवे 11 जवळ आपलं नियंत्रण गमावलं. लँडिंगआधी जमिनीवर येऊन धडकलं. त्यामुळे विमानात मोठा स्फोट होऊन आग लागली.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या प्रायवेट चार्टर फ्लाईटमध्ये असलेल्या पिंकी माळी कोण? त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसशी काय कनेक्शन?
Pinky Mali-Ajit Pawar
| Updated on: Jan 28, 2026 | 3:39 PM

बारामती एअरपोर्ट जवळ बुधवारी सकाळी अजित पवार यांचं खासगी प्रायवेट चार्टर विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यात एअरक्राफ्ट स्टाफ पिंकी माळी यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह मुख्य पायलट सुमीत कपूर, पायलट शांभवी पाठक आणि चार्टर स्टाफ पिंकी माळी यांनी प्राण गमावले. पिंकी माळी प्रायवेट चार्टरमध्ये स्टाफ म्हणून कार्यरत होत्या. तिचे वडिल शिवकुमार माळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत.

अपघाताच्या आदल्यारात्री पिंकी माळी यांनी आपल्या कुटुंबाशी संपर्क केला होता. उद्या बारामतीला जाणार असं तिने कुटुंबियांना सांगितलेलं. अजित पवार स्वत: आमच्याशी बोलले होते, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. पिंकी माळी यांचा मृतदेह मुंबईत आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असं महाराष्ट्र सरकारकडून कुटुंबाला आश्वासन देण्यात आलं आहे.

अपघाताची चौकशी होणार

अजित पवार यांच्या चार्टर फ्लाइटमध्ये फ्लाइट स्टाफ म्हणून कार्यरत असण्याची पिंकी माळी यांची तिसरी वेळ होती. या अपघाताची चौकशी होणार आहे.

अपघात किती वाजता झाला?

अजित पवार आज सकाळी VSR Aviation कंपनीच्या Learjet 45XR विमानाने मुंबईहून बारामतीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या आज तिथे चार सभा होत्या. जवळपास 8.45 च्या सुमारास अजित पवारांचं विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना कोसळलं. हे विमान नॉन‑शेड्यूल्ड चार्टर सेवेचं भाग होतं. दिल्लीतील VSR Aviation (VSR Ventures Pvt Ltd) नावाची कंपनी हे विमान ऑपरेट करत होती.

रनवे 11 जवळ आपलं नियंत्रण गमावलं

विमानाने लँडिंग दरम्यान रनवे 11 जवळ आपलं नियंत्रण गमावलं. लँडिंगआधी जमिनीवर येऊन धडकलं. त्यामुळे विमानात मोठा स्फोट होऊन आग लागली. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि स्थानिक लोकांनी सांगितलं की, अपघातानंतर विमानाच्या स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले. विमानाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं होतं.

लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानांचे याआधीही अनेक अपघात झालेत. जगभरात या श्रेणीच्या विमानांचे जवळपास 200 अपघात झालेत. वर्ष 2023 मध्ये मुंबईतही लियरजेट-45 विमानाला अपघात झाला होता.