
Ajit Pawar plane crash: 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण राज्यासाठी काळा दिवस ठरला… त्यामागे कारण देखील फार मोठं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 मिनिटांनी बातमी आली विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन… या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली, तर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे प्राण गेले आहेत. दादांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना अभिनेत्री राखी सावंत हिने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राखी सावंत हिने प्रतिक्रिया दिला आहे… ‘मी अजिद दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे… मला खूप दुःख झालं आहे… कोणी काहीही म्हणो की यामागे राजकारण नाही, मात्र हे एक षडयंत्र आहे. ते आमचे आवडते नेता होते. हे एक षड्यंत्र आहे, बरोबर ना?’ असा प्रश्न देखील राखी सावंत हिने याठिकाणी उपस्थित केला आहे.
सांगायचं झालं तर, अजित पवाप यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. तशीच पोकळी सत्तेतही जाणवू लागली. अजित पवार यांच्या निधनला अद्याप तीन दिवस देखील झालेले नाहीत. तर दुसरीकडे राजकारणात मोठ्या हलचाली घडत असल्याचं चित्र दिसत आहे. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.
शनिवारी दुपारनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. तर मध्यरात्री सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीत कालपासून वेगवान घाडमोडी घडत आहे. आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर, बारामती विमानतळ येथील पायाभूत सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विमानतळावर पायलट करेक्ट अल्टिट्यूड टेक्नॉलॉजी (PAPI) आणि ILS (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्या दिवशी दृश्यमानता फक्त 800 ते 3,000 मीटर दरम्यान होती, जी सुरक्षित लँडिंगसाठी खूप कमी मानली जात होती.