अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर, सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान आता या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर, सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Ajit Pawar plane crash
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 4:31 PM

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला, क्षणात विमानाला भीषण आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता या विमानातील ब्लॉकबॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅकबॉक्स सापडला होता.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या ब्लॅकबॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे.  अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. हा ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने त्यातील डेटा खराब झाला का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून ब्लॅकबॉक्स रिकव्हर केला गेला होता. आता जी माहिती समोर आली आहे, त्या माहितीनुसार हा ब्लॅकबॉक्स काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत सापडल्याचं बोललं जात आहे.  त्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील माहिती रिकव्हर करण्याची गरज आहे, त्यासाठी आता हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाऊ शकतो, केंद्र सरकार याबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यांनतर हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.  डेटा रिकव्हरीनंतर त्या ब्लॅकबॉक्समधून कोणती माहिती समोर येते ते पहावं लागणार आहे. दरम्यान काही जणांकडून या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील डेटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लवकरच डेटा रिकव्ह होण्याची शक्यता आहे.