मोठी बातमी! सापाला दूध पाजलं तरी… पार्थ पवारांची खळबळजनक पोस्ट; टार्गेटवर नेमकं कोण?

पार्थ पवार यांच्या एका पोस्टमधील मजकुराने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. 'साप' म्हणत त्यांनी नेमका कोणाला उद्देशून हा इशारा दिला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

मोठी बातमी! सापाला दूध पाजलं तरी... पार्थ पवारांची खळबळजनक पोस्ट; टार्गेटवर नेमकं कोण?
parth pawar shared cryptic post
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 10:16 PM

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा सापच असतो, असा मजकुर पार्थ पवार यांनी स्टेटसला लावला आहे. तसेच अशा आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही त्यांनी लावली आहे. त्यामुळे या स्टेटसमधून नेमका कोणाला टोला लगावण्यात आला आहे, याची मोठी चर्चा रंगू लागली आहे. डसणारा साप म्हणून नेमका कोणाचा उल्लेख केला याची राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

खासदार पार्थ पवार यांच्या एका स्टेटसने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात खळबळ उडाली आहे. ‘तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, पण साप हा सापच असतो’, असा मजकूर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याच आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही त्यांनी शेअर केली आहे.

Loading...

पार्थ पवार यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या स्टेटसमधील ‘साप’ नेमका कोण? त्यांनी कोणाला उद्देशून हा टोला लगावला आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, पार्थ पवार यांनी या पोस्टमधून कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्टेटसमागील नेमका संदर्भ काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us