AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ते जीन्स पँटचं चुकीचं झालं, पण…” अजित पवार यांचं सरकारी ड्रेसकोडवर भाष्य

महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करत जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार केले आहेत

ते जीन्स पँटचं चुकीचं झालं, पण... अजित पवार यांचं सरकारी ड्रेसकोडवर भाष्य
| Updated on: Dec 14, 2020 | 7:48 AM
Share

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स घालू नये, असे ड्रेस कोडसंदर्भातील नियम (Dress Code Rules) राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ते जीन्स पँटचं चुकीचं झालं, पण आम्ही त्याबद्दल अधिक विचार करत आहोत’ असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे टीशर्ट नाही, तरी किमान जीन्स घालण्याबाबत दिलासा मिळण्याची पुसटशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. (Ajit Pawar talks on State Government Rules about Dress Code and Jeans)

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ‘सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण कपडे घालून यावे, ही सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच मंत्रालयात टीशर्ट घालून येत नाहीत. घरी असताना टीशर्ट घातल्यास ठीक आहे. पण जीन्स पँटचं चुकीचं झालं. आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत’ असं अजित पवार म्हणाले.

जीन्स-टीशर्ट चर्चेत का?

महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

सरकारची भावना काय?

सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केल्याचं बोललं जातं. आता सरकारने कर्मचाऱ्यांची वेशभूषा बदलली असली, तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहणार आहे. ज्या पद्धतीचा त्रास नागरिकांना सर्वाधिक होतो, ती पद्धत बदलण्यासाठी सरकारने काही तरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे, तरच कपड्यांसोबत बदललेला सरकारी कर्मचारीही व्यवस्था बदलाचा भाग होईल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

काय आहेत सूचना?

  • गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत
  • अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये
  • कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत
  • महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावेत

पादत्राणांविषयी नियमावली

  • स्लीपर घालण्यासही सरकारी कार्यालयात परवानगी नाही
  • महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावेत
  • पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी
  • कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये
  • (Ajit Pawar talks on State Government Rules about Dress Code and Jeans)

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (14 डिसेंबर) मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोनशे निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेले आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करत सरकार मार्गक्रमण करत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारचा आदेश जारी; आता एकाच गणवेशात अधिकारी आणि कर्मचारी

काय कपडे घालायचे हे लोकांना कळतं; रोहित पवारांचा साई संस्थानाला टोला

(Ajit Pawar talks on State Government Rules about Dress Code and Jeans)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.