जीवघेण्या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षाचा मृत्यू, महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळजनक घटना
काँग्रेस नेते हिदायत पटेल मृत्यूप्रकरणी पटेल यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये शेंकडोंचा जमाव. मारेकरी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी तर इतर आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनगरे आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आज दुपारी हिदायत पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हिदायत पटेल यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आरोपींना तात्काळ अटक करा. अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात येईल. मृतक हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांची मागणी”
हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का? याकडे लक्ष लागलं आहे.
तक्रारीत मोठी नावं
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हत्या प्रकरण. हल्ला प्रकरणात पाच आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. रात्री पाच आरोपींवर खुनाचा प्रयत्न करीत कट रचल्याचा आरोप असल्याने गुन्हे दाखल. पटेल कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल. आता हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात खुनाचं कलमं लावणार का?, याकडे लक्ष. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नावं आहेत.
कोणाची नावं?
हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नाव आहेत.
पणज गावातून केली अटक
याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल. अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदवण्यात आलाय गुन्हा. काल अकोट तालूक्यातील मोहाळा गावात हिदायत पटेल यांच्यावर उबेद पटेल या तरुणाने हल्ला केल्यानंतर आज सकाळी पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोर आरोपी उबेद पटेलला रात्री अकोट तालुक्यातल्या पणज गावातून केली अटक. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ.
