मोठी बातमी! अजितदादांच्या नेतृत्वात सर्व प्लॅन तयार, सुप्रिया सुळेंनी संगळंच सांगितलं

आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेनंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! अजितदादांच्या नेतृत्वात सर्व प्लॅन तयार, सुप्रिया सुळेंनी संगळंच सांगितलं
सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 10, 2026 | 8:02 PM

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. आज दोन्ही राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद पुण्यात पार पडली, या पत्रकार परिषदेत जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर बोलताना आता सुप्रिया सुळे यांनी या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  

अजितदादांनी सविस्तर सांगितलं आहे,  आम्ही पुण्याचे दोन्ही प्रतिनिधी वन थर्ड प्रतिनिधी आहोत. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथे पण टँकर येते. टँकर माफिया वाढत चालले आहेत. मेट्रोची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली पाहिजे. अजितदादांनी जो उल्लेख केला तो मेट्रो प्रकल्प आम्ही यशस्वी चालवू,  त्याचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे.  यातील अनेक गोष्टी आम्ही यशस्वी करून दाखवल्या आहेत. सहकाऱ्यांनी चांगल्या गोष्टी केल्या आहेत. पुण्याच्या  वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, या बद्दलचा सगळा प्लॅन अजितदादांच्या नेतृत्वात तयार आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या सगळ्या गोष्टी होवू शकतात का?  तर होवू शकतात. यासाठी सगळ्यांची इच्छा शक्ती आहे,  पुणे देशातील महत्वाचं शहर आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं युती केली आहे.  त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, यावर ताई आणि दादा मनाने एकत्र आले का ? की ही पॉलिटिकल एडजस्टमेंट आहे ? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला, यावर प्रतिक्रिया देताना तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसमोर आता दोन्ही राष्ट्रवादीचं मोठं आव्हान असणार आहे.