AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव सायेबांचं मन लई मोठं हाय… लेकाला उमेदवारी मिळताच मायच्या डोळ्यात अश्रू, अंबादास दानवेंच्या घरातील भावूक क्षण

Ambadas Danve : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांची आई सगुणाबाई दानवे आणि पत्नी अनुराधा दानवे यांनी भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांचे आभार मानले.

उद्धव सायेबांचं मन लई मोठं हाय... लेकाला उमेदवारी मिळताच मायच्या डोळ्यात अश्रू, अंबादास दानवेंच्या घरातील भावूक क्षण
Ambadas DanveImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 6:35 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापू लागल आहे. आज उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दानवे हे आधीही विधान परिषदेत होते, त्यांनी विरोधीपक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. अशातच आता अंबादास दानवे यांच्या आई आणि पत्नीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव साहेबांनी वचन पूर्ण केलं…

अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री सगुनाबाई दानवे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले. यावेळी बोलताना सगुनाबाई दानवे यांनी म्हटले की, ‘उद्धव साहेब उभे राहणार होते, मात्र त्यांनी उमेदवारी माझ्या मुलाला दिली हेच खूप मोठे झालं. उद्धव साहेब माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होतं माझ्या मुलाला कुठे कमी पडू देणार नाही ते त्यांनी वचन पूर्ण केलं.’

मला माझ्या मुलाचा अभिमान आहे

पुढे त्यांना डोळ्यातील आनंदाश्रूंबद्दल विचारण्यात आले, यावर बोलताना सगुनाबाई यांनी म्हटले की, आनंदाश्रू म्हणजे आम्ही खूप कष्ट केले, अंबादास कधी एक दिवस घरी राहत नाही या गावावरून त्या गावाला फिरत राहतो. घरातलं कधीच बघत नाही पूर्ण जनतेचेच बघतो. माझं बोलणं झालं आहे, साहेबाची उमेदवारी मला दिले म्हणून सांगितल आहे. लहान भावासारखं सांभाळून घेतलं हेच मोठे कर्तव्य केलं त्यांनी. मला खूप अभिमान आहे मला माझ्या मुलाचा. उद्धव ठाकरे साहेबांचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर आता. बालपणी खूप परिस्थिती बेकार होते ते काही सांगायचं काम नाही, आता माझे चारही मुलं कमवते झाले. मी मेस चालवली, बिड्या बांधून मुलांचे शिक्षण केल आहे. मी जे कष्ट केले ते माझ्या मुलांच्या कामाला आले, उद्धव ठाकरे साहेबांना माझे कोटी कोटी नमस्कार.

पत्नीनेही मानले उद्धव ठाकरेंचे आभार

अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे यांनी म्हटले की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने ते तयार झाले आहेत. आताही या जागेसाठी उद्धव साहेबांचे नाव पुढे येत होतं, तरीसुद्धा उद्धव साहेबांनी त्यांची जागा दिली उद्धव ठाकरेंचं मन खूप मोठं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद मी मानेल. ते घरी थांबत नाहीत, वेळ देत नाहीत पण आम्ही सगळे सांभाळून घेतो. पंचवीस वर्षापासून त्यांचे कार्य चालू आहे, पद असो किंवा नसो त्यांचे कार्य चालू असतं. त्यांना उमेदवारी मिळाली तेव्हा खूप आनंद झाला, उद्धव साहेबांचे खरंच खूप धन्यवाद मानते. साधी गोष्ट नाही, उद्धव ठाकरेंचं मन खूप मोठं आहे, त्यांनी ही जागा दिली, त्यासाठी खूप मन मोठं असावं लागतं.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच