AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे राज्यात दुष्काळाची धग, दुसरीकडे सुरेश धस यांची ‘हेलीकॉप्टर राईड’, मेळावा संपवून पुन्हा मुंबई; ‘धावपळीची’ चर्चा!

एकीकडे दुष्काळाच्या झळा उभा महाराष्ट्र भोगत असताना आता दुसरीकडे मंत्री निवडणूक दौरा असल्याप्रमाणे हेलिकॉप्टरने पायधुळ झाडत असल्याने सर्वसामान्यांची मतीगुंग व्हायची वेळ आली आहे.

एकीकडे राज्यात दुष्काळाची धग, दुसरीकडे सुरेश धस यांची ‘हेलीकॉप्टर राईड’, मेळावा संपवून पुन्हा मुंबई; ‘धावपळीची’ चर्चा!
BJP MLA Suresh Dhas enters Vadwani by helicopter
| Updated on: Oct 01, 2026 | 11:08 PM
Share

अशोक काळकुटे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – राज्यात यंदा एल-निनो इफेक्टमुळे मोठा दुष्काळाची चाहुल लागली आहे. पाऊस पुरेसा पडला नसल्याने पिके करपून गेली आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर आताच सुरु झाले आहेत. अजून नऊ महिने तग धरुन राहायचे आहे. कारण पुढील पाऊन नऊ महिन्यानंतर पडणार आहे. धरणात पाणी साठी कमी आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. यात बीडच्या वडवणीतील ऊसतोड मजुरांच्या मेळाव्याला भाजपाचे आमदार मुंबईवरुन थेट हेलिकॉप्टरने आल्याने सरकार जनतेचे पैसे कसे उधळत आहे याची चर्चा सुरु आहे.

भाजपाचे आमदार सुरेश धस हे मुंबईहून आज वडवणी शहरात ऊसतोड मजुरांच्या मेळाव्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आले. त्यांनी वडवणी शहरातील ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या मेळाव्याला हजेरी लावली. आता कारखान्यावर गेल्यानंतर शंभर टक्के दरवाढीसाठी ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार संप करणार आहेत. या मेळाव्यात भाजपाचे आमदारांनी थेट धुरळा उडवत हेलिकॉप्टरने हजेरी लावल्याचे कौतूक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. तर ऊसतोड मजूर मात्र अवाक होऊ हे सर्व पाहात होते. आता ऊसतोड कामाची मजूरी आपल्याला वाढवून मिळणार की नाही ? मिळणार तर किती मिळणार याचे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

जाताना सोबत वडापाव घेतले..

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दररोज पत्रकार परिषदांचा रतिब लावला होता. आणि वाल्मिक कराड आणि त्यांचा आकावर रोज खुराक मिळेल असे प्रकरण लावून धरले होते. अखेर त्याची परिणीती राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात झाली. या प्रकरणानंतर मात्र भाजपाचे आमदार सुरेश धस आता टीव्हीवर फारसे दिसत नाहीत. मात्र, आज वडवणी शहरात त्यांनी हेलिकॉप्टरने निवडणूक दौरा असल्या प्रमाणे एण्ट्री केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यात सुरेश धस मुंबईवरुन हेलिकॉप्टरने आले मेळाव्यात भाषण केले. आणि पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. यावेळी जाताना त्यांनी सोबत वडापाव घेतल्याची चर्चा सर्वत्र होती.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना