AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नोटीस घरी स्वीकारणार नाही, अमित ठाकरेंच्या भूमिकेमुळे पोलीस शिवतीर्थाबाहेर ताटकळले

Amit Thackeray : नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस अमित ठाकरेंनी नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत.

मोठी बातमी! नोटीस घरी स्वीकारणार नाही, अमित ठाकरेंच्या भूमिकेमुळे पोलीस शिवतीर्थाबाहेर ताटकळले
Amit Thackeray and Police
| Updated on: Nov 19, 2025 | 6:36 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे आणि जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नोटीस देण्यासाठी आज पोलीस शिवतीर्थावर आले आहेत, मात्र अमित ठाकरेंनी घरी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे.

अमित ठाकरेंचा घरी नोटीस स्वीकारण्यास नकार

नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आज पोलीस अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. मात्र अमित ठाकरे यांनी मी नेरूळ पोलीस स्टेशनला आलो असतो नोटीस घरी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नेरूळ पोलीस शिवतीर्थाबाहेर नोटीस देण्यासाठी वेटिंगवर असल्याचे पहायला मिळत आहे.

महाराजांसाठी पहिली केस झाली…

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘महाराजांसाठी पहिली केस झाली असेल तर चांगलं आहे. मला बरं वाटतंय. काल दिघा आणि कोपर खैराणे ला गेलेलो. गजानन काळे सोबत होते. त्यांनी सांगीतलं की महाराजांचा पुतळा आहे पण चार महिने अनेक आंदोलने करून देखील खुला केला नाही. काल त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्घाटन केले’ असं अमित ठाकरे म्हणाले होते.

नेत्यांना पुतळ्याच्या उद्घाटनाला वेळ नाही – अमित ठाकरे

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले होते की, ‘महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो. गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उदघाटन करायला वेळ नाही मिळाला. त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू. पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केला आहे. पोलिसांचे काम आहे, त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांवर वरून प्रेशर असतो.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.