अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीकता?, कोल्हे यांनी सांगितलं नेमकं काय

बरेच दिवस काम जिल्हा नियोजन समितीची प्रलंबित होती. आता त्याला मंजुरी मिळाली आहे.

अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीकता?, कोल्हे यांनी सांगितलं नेमकं काय
अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 11:26 PM

मुंबई – राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी डीपीडीसीचा फंड मतदार संघाला मजूर झाला. त्यामुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे धन्यवाद मानले आहेत. भाजपशी सलगी आणि राष्ट्रवादीशी दुरावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. ही चर्चा अकारण आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यपाल हटवण्याच्या मागणीला देखील त्यांनी समर्थन दिले आहे.  बरेच दिवस काम जिल्हा नियोजन समितीची प्रलंबित होती. आता त्याला मंजुरी मिळाली आहे. यात राजकारण काही नाही. माझ्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख असल्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानले आहेत. यात वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.

आधीच्या कामांना स्थगिती याच सरकारनं दिली होती. आता मंजुरीपण याच सरकारनं दिली आहे. त्यामुळे आधीच्या सरकारच्या गतिमानतेचा आणि ह्या सरकारच्या गतिमानतेचा काहीच संबंध नाही. अमित शाह भेटीबाबत अमोल कोल्हे म्हणाले, हे उगाच चर्चा घडवली जात आहे. शिवप्रताप गरुड हा जो सिनेमा आला होता त्या संदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो होतो.

किल्ला शिवनेरीवर भगवा लागावा, शिवनेरीवर रोपवे व्हावा आणि छत्रपती शिवाजी महराजांचा जो जाजल्य इतिहास आहे त्या सिनेमाचं स्क्रिनिंग दिल्लीत व्हावं, यासाठीची ती भेट होती.

भाजपमध्ये जाण्याची चर्चा ही अकारण आहे. लोकसभा निवडणूक 2024 साली आहे. आभाळ कानी वारा पाहून शेत नांगरायला घेतात. शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून उगाच आउत खांद्यावर घेऊन फिरत नाही. अकारण चर्चा घडवण्यात काही अर्थ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेची काम मार्गी लावणे आणि आमचे नेते शरद पवार आणि लोकसभेत आमच्या गट नेत्या सुप्रिया ताई यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत.

शिर्डीच्या कार्यक्रमात मी नव्हतो कारण माझ्या डेंटलचा प्रॉब्लेम होता. स्टार प्रचारकांची यादी बनवणं हे माझ्या हातात नाही. म्हणून त्याबद्दल मी काही उत्तर देऊ शकत नाही. मला दुसऱ्याच्या कानात काही बोलण्याची गरज नाही. माझ्या मतदार संघातील काम मार्गी लावणे ह्याला माझं प्राधान्य आहे, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.