AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकीय वर्तुळातील धमकी सत्र सुरुच; आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी

MLA Ravi Rana Death Threat : आधी छगन भुजबळ, मग धनंजय मुंडे अन् आता रवी राणा; धमकीच्या फोनचं सत्र थांबता थांबेना...

राज्याच्या राजकीय वर्तुळातील धमकी सत्र सुरुच; आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी
Updated on: Jul 12, 2023 | 10:28 AM
Share

अमरावती : कालपासून राज्याच्या राजकारणात धमक्यांच्या फोनचं सत्र सुरू आहे. काल सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं. त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, मंत्री धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आला आणि आज आणखी एका आमदाराला धमकीचा फोन आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

तू महाराष्ट्रभर फिरणं बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचं काही तरी करून टाकू. अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने रवी राणा यांना दिला आहे.

तू एवढ्या वेळेस आमच्या विरोधात कसा काय बोलतो. आता हे सगळं थांबव नाही तर तुला संपून टाकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 507 नुसार छत्रपती संभाजीनगरमधल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा धमकी प्रकरणाचा राजापेठ पोलीस तपास करीत आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं तो तरूण सांगत होता.

भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जात आहे. या तपासात पुण्यातील एका तरूणाला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. तसंच भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन

मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपये द्या अन्यथा…, असं म्हणत धनंजय मुंडे यांना फोन आला आहे.

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.