अमरावती जिल्हा खून, बलात्कारामुळे हादरला; 17 तासात चार हत्या; महिलेवर बलात्कार करुन ठार मारले

गेल्या सतरा तासांपासून अमरावती जिल्ह्यात चार हत्या झाल्या असून बलात्काराचीही एक घटना घडली आहे. या घटनांमुळे पोलिसांनी तपास चक्रे जोरदारपण फिरवली असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावती जिल्हा खून, बलात्कारामुळे हादरला; 17 तासात चार हत्या; महिलेवर बलात्कार करुन ठार मारले
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 8:58 AM

अमरावती: एकीकडे गणेश चतुर्थीची धामधूम सुरू असतानाच अमरावती परिसर (Amravati District Area) मात्र खुनाच्या आणि बलात्काराच्या घटनांनी हादरला आहे. अमरावती जिल्ह्यात चार खून (4 Murder) आणि बलात्काराची (Rape) घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 17 तासांमध्ये दोघांची निघृण हत्या झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर मेळघाटमधील सुसरदा गावातमध्ये भावानेच आपल्या भावावर हल्ला करुन त्याची हत्या केल्याने गणेश चतुर्थीच्या काळातच गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी हत्या करणाऱ्या भावाला ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू केला आहे. दोघा भावांमध्ये कशावरुन वाद सुरू होता त्याचा तपास सुरू केला असून या प्रकरणा आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस सुरू असतानाच आणि सगळी धामधूमीचे वातावरण झालेले असतानाही अमरावती जिल्हा मात्र खुनाच्या घटनांनी हादरला आहे.

जिल्ह्यात 17 तासात 4 हत्या

गेल्या सतरा तासांपासून जिल्ह्यात चार हत्या झाल्या असून बलात्काराचीही एक घटना घडली आहे. या घटनांमुळे पोलिसांनी तपास चक्रे जोरदारपण फिरवली असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भावाने केली भावाची हत्या

अमरावती शहरात 17 तासांत दोघांची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. तर मेळघाटमधील सुसरदा गावामध्ये भावाकडून आपल्या भावाची हत्या करण्यात आली आहे. सुसरदा गावावर शोककळा पसरली आहे.

महिलेवर बलात्कार करून ठार मारले

ही घटना ताजी असतानाच तर शेताच्या बांधावर बैल चारण्याच्या वादावरून महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न

अमरावती जिल्ह्यात सतरा तासात चार हत्या आणि बलात्काराची घटना घडल्याने जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घडलेल्या या प्रकरामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.