AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनवरून परतलेल्या साहिरचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत, कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद

युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा शाहिर तेलंग हा विद्यार्थी चांदूररेल्वे येथे त्याच्या घरी सुखरूप परतला आहे. घरी येताच त्याचे चांदूररेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिकांनी घरी जाऊन स्वागत केले.

युक्रेनवरून परतलेल्या साहिरचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत, कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद
साहिर तेलंग याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 2:26 PM
Share

अमरावती : युक्रेनमध्ये (Ukraine) एमबीबीएसच्या (mbbs) शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा साहिर तेलंग (Sahir Telang) हा विद्यार्थी चांदूररेल्वे येथे त्याच्या घरी सुखरूप परतला आहे. घरी येताच त्याचे चांदूररेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिकांनी घरी जाऊन स्वागत केले. युक्रेनविरोधात रशियाने युद्ध सुरू केले आहे. आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक युद्ध सुरू झाल्याने व युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमान उड्डाने बंद असल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकीच एक साहिर तेलंग हा विद्यार्थी होता. मात्र तो आता त्याच्या चांदूररेल्वे येथील घरी सुखरूप पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. साहिर कधी घरी परतणार याकडे त्याच्या कुटुंबीयांचे डोळे लागले होते. मात्र आता तो सुखरुपपणे घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

मुलगा घरी परतल्याचे समाधान

माझा मुलगा घरी आल्याने मला समाधान वाटत आहे. माझ मुलगा सुखरूप घरी परतला. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तो तिकडे अडकला होता. प्रसारमाध्यमातून युद्धाच्या बातम्या कानावर पडत असल्याने आमची चिंता वाढली होती. आम्ही तो कधी परत येतो याची वाट बघत होतो. अखेर तो दिवस उजाडला, माझा मुलगा घरी आला आहे. माझा मुलगा जरी घरी अला असला तरी देखील अजूनही भारतामधील हजारो विद्यार्थी कीव व खार्गिव सारख्या शहरांमध्ये अडकले आहेत. त्यांची देखील काळजी वाटते, सरकारने  या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर घरी आणावे अशी प्रतिक्रिया शाहीर यांचे वडील प्रसेनजीत तेलंग यांनी  दिली आहे.

विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न

दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी भारतात आणण्यासाठी विमानाच्या पाच फेऱ्या करण्यात आला आहे. आज सकाळीच जवळपास 250 विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विमान दिल्लीत दाखल झाले. या मुलांनी सरकारचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पुतीनविरोधात लाखो लोक उतरले रस्त्यावर

Russia Ukraine War | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी उच्च स्तरीय प्रयत्न, युक्रेनशेजारील देशात केंद्रीय मंत्र्यांचं पथक जाणार!

बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं