Navneet Rana | राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे, विनापरवाना रॅली काढणे भोवले, पोलिसांनी कोणते गुन्हे दाखल केले?

Navneet Rana | राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे, विनापरवाना रॅली काढणे भोवले, पोलिसांनी कोणते गुन्हे दाखल केले?
राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे, विनापरवाना रॅली काढणे भोवले
Image Credit source: tv9

परवानगी न घेता स्वागत रॅली काढणे, मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अशा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आलाय.

स्वप्नील उमप

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 29, 2022 | 3:55 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल छत्तीस दिवसांनंतर काल अमरावतीत दाखल झाले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस काही चुकले नाही. राज्य सरकार वर्सेस राणा दाम्पत्य असा हा सामना आहे. अशा कितीतरी रॅली (Rally) निघत असतात. पोलिसांना माहीत असते. पण, ते कारवाई करत नाही. मात्र, राणा दाम्पत्य राज्य सरकारवर टीका करत असल्यानं सूडबुद्धीनं त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत, हे या प्रकरणावर स्पष्ट होते. राणा दाम्पत्याला विनापरवानगी स्वागत रॅली काढणे भोवले. दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांसह शंभरपेक्षा अधिक युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गाडगेनगर पोलिसात (Gadgenegar Police) गुन्हा दाखल झालेत. राजापेठ पोलीस स्टेशनमध्येही (Rajapeth Police Station) राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

परवानगी न घेता रॅली

परवानगी न घेता स्वागत रॅली काढणे, मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अशा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आलाय. विना परवानगी क्रेन व वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यापूर्वीही तीन कार्यकर्त्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरा बारा वाजतापर्यंत राणा दाम्पत्याच्या घरासमोर स्वागताचा कार्यक्रम सुरू होता. रात्री दहा वाजतानंतर लाउडस्पिकरला बंदी असतानाही स्पिकर सुरू होते. दहा वाजले तरी सुद्धा भजन कार्यक्रम सुरूच होता. दसरा मैदान हनुमान मंदिरात लाऊड स्पीकरवर भजन कार्यक्रम सुरूच होता. त्यामुळं पोलिसांनी ही कारवाई केली.

नियमांचं उल्लंघन झाले नाही

यासंदर्भात रवी राणा म्हणाले, आम्ही बाहेरचा स्पीकर पावणेदहाला बंद केला होता. पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने कारवाई करावी. या मंदिरात रात्री 2 वाजेपर्यंत भजन कीर्तन चालतात. त्यामुळे नियम मोडला नसल्याचे त्यांनी सांगितले. राणा दाम्पत्य स्पष्टीकरण देत असले, तरी पोलीस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही संधी सोडणार नाहीत, असेच या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें