AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी, अमरावतीत खळबळ

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाचं राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील साधुसंतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांनादेखील देण्यात आलं आहे. त्यामुळे विदर्भ पिठात आनंदाचं वातावरण असताना एका निनावी पत्राने सर्वजण हैराण झाले आहे.

जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी, अमरावतीत खळबळ
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 13, 2024 | 2:18 PM
Share

अमरावती | 13 जानेवारी 2024 : रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पिठावर निनावी पत्राद्वारे राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्रामध्ये तुम्ही जे अयोध्या-अयोध्या करत आहात ते महागात पडेल, आज नाही तर उद्या तुमचा अंत निश्चित आहे, अशी धमकी पत्राद्वारे महाराजांना देण्यात आली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे. त्यानंतर त्यांच्या अयोध्येत जाण्यासाठीची तयारी सुरु झाली होती. पण या दरम्यान, अचानक जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित धमकीचं पत्र समोर आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कुर्हा येथील पोलीस ठाण्यामध्ये जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विदर्भ पीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज निवदेन दिलं.

‘महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांना सुरक्षा द्या’, महाराजांच्या अनुयायांची मागणी

स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांच्या अनुयायांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना आठ दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं विशेष निमंत्रण आलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व ट्रस्टी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत असताना काल एक घटना घडली. स्वामीजींना धमकी वजा इशाऱ्याचं एक पत्र आलं आहे. त्यात स्पेशल उल्लेख केलाय की, तुम्ही अयोध्याला गेलात तुमचा अंत निश्चित आहे. आम्ही सर्वांनी या पत्राचं गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. त्यानंतर आज लगेच आम्ही एसपींना भेटलो”, असं महाराजांच्या अनुयायांनी सांगितलं.

हेही वाचा : Ram Mandir | महाराष्ट्रातील ‘या’ सरपंचाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण

“आमची सरकारला एवढीच विनंती आहे की, जगद्गुरु रामराजेश्वर महाराजांना तात्काळ सुरक्षा पोहोचवावी. तसेच भारतात आज एक विचित्र वातावरण होतंय. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा साधुसंताना छेडलं जातंय, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. अमरावतीतही बरेचसे साधुसंत आहेत जे अयोध्येला जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासोबतही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी शासनाला विनंती करेन की, आपण महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांना सुरक्षा द्यावी”, असं महाराजांचे अनुयायी म्हणाले.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन