Navneet Rana : खासदार नवनीन राणा गेल्या पाचडोंगरीत भेटायला, राणा यांना प्यायला दिले विहिरीतील दूषित पाणी, मग काय….

| Updated on: Jul 12, 2022 | 7:45 PM

गावकरी पितात तेच पाणी नवनीत राणा यांना प्यायला दिले. तेव्हा त्या संतापल्या. तुमच्या सरपंचांनी मला कधी फोनतरी केला का, असा सवाल राणा यांनी विचारला.

Navneet Rana : खासदार नवनीन राणा गेल्या पाचडोंगरीत भेटायला, राणा यांना प्यायला दिले विहिरीतील दूषित पाणी, मग काय....
राणा यांना प्यायला दिले विहिरीतील दूषित पाणी, मग काय....
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात काही गावांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाचडोंगरी, कोयलारी, कटकुंभ आणि चुरणी या गावात विहिरीतलं दूषित पाणी लोकं पितात. असं दूषित पाणी प्यायल्याने 300 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासकीय (Administration) यंत्रणा (System) हादरली. तोपर्यंत या गावांकडं कुणाचं लक्ष नव्हतं. खासदार नवनीत राणा यांनी या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ते कुठल्या विहिरीचे पाणी पितात, याची माहिती घेतली. घटनास्थळी पोहचल्या. तेव्हा तिथं भयानक परिस्थिती दिसली. विहिरीतील पाणी हातानं काढता येते. तेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. हे दूषित पाणी पिल्यामुळंच डायरियाची लागण झाली. त्याच विहिरीत पाणी एका सामाजिक कार्यकर्त्यांना (Social Worker) राणा यांना पिण्यासाठी दिले.

सरपंचांनी मला कधी फोन केला का?

गावकरी पितात तेच पाणी नवनीत राणा यांना प्यायला दिले. तेव्हा त्या संतापल्या. तुमच्या सरपंचांनी मला कधी फोनतरी केला का, असा सवाल राणा यांनी विचारला. ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. यासंदर्भातील व्हिडीओ आता समोर आला. नवनीत राणा ह्या मेळघाटात गेल्या होत्या. दूषित विहीर पाहून त्यांनी नागरिकांना तुम्ही कधी फोन नाही केला की अशी समस्या आहे? असा सवाल उपस्थित केला. तेव्हा हे गाव वसल्यापासून येथील नागरिक हेच पाणी पित आहेत. पण सरकारने लक्ष दिलेलं नाही. यावेळी त्यांनी इतर माहिती घेतली. सरपंच फोन उचलत नाही, अशी तक्रार गावकऱ्यांनी राणा यांना केली. यावेळी राणा यांनी गावाचा सरपंच बदलण्याचे वक्तव्य केलं. दरम्यान, गणेश राठोड या सामाजिक कार्यकर्त्याने राणा यांनी विहिरीतले दूषित पाणी राणा यांना पिण्यास दिले. त्यावेळी त्या संतापल्या.

हनुमान चालिसा वाचून समस्या सुटत नाही

पालडोंगरी येथील घटना दुर्दैवी आहे. शासनानं यापुढ दक्षता घ्यावी. उपाययोजना करावी. अधिकाऱ्यांना तीन जणांचे जीव गेल्यानंतर जाग आली. आमदार खासदार सांत्वन देत आहेत. आधीच आले असते तर ही घटना घडली नसती. अधिकाऱ्यांसमोर पाणी काढला. पाणी पिण्यासाठी दिला. खासदार राणा यांनी नकार दिला. हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहेत का, असा सवाल गणेश राठोड यांनी केला. राठेड म्हणाले, हनुमान चालिसा वाचून समस्या सुटत नाही. गावात पाण्याची योजना सुरू करावी. चोवीस तास स्वच्छ पाणी मिळावेत. मृतकांच्या कुटुंबीयांना मोबदला मिळाला पाहिजे. शासकीय नोकरी द्यायला पाहिजे, अशी मागणी राठोड यांनी केली.