AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Flood : आर्णी शहरात शिरले पुराचे पाणी, नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसळली दरड, फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. त्यामुळं वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाट हे वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Yavatmal Flood : आर्णी शहरात शिरले पुराचे पाणी, नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसळली दरड, फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प
आर्णी शहरात शिरले पुराचे पाणीImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 6:41 PM
Share

यवतमाळ : विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (Arni) शहरात पुराचे पाणी शिरल्यानं नागरिकांची (Citizen) त्रेधातीरपट उडाली. नागपूर-तुळजापूर महामार्गावर दरड कोसळली. त्यामुळं काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प पुरामुळं ठप्प झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्रीपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला. शहरातील अरूनावती (Arunavati) नदी दुथळी वाहत आहे. नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात शिरले. आर्णी शहरातील अनेक प्रभागात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी सावधगिरी म्हणून वाहन चालकांना थांबण्याचा सल्ला दिला आहे. दरड कोसळत असताना मोठ मोठे दगड वरून खाली पडत असल्याने वाहन चालक लांबूनच वाहन थांबवून बसले आहे.

कोसदनी घाटात दरड कोसळली

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. त्यामुळं वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाट हे वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात नेहमीच या ठिकाणी दरड कोसळत असल्याचा घटना घडताय. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. अशात नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. वनवे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसर्‍या बाजूचीदेखील दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.

नवनिर्मित पर्यायी पूल गेला वाहून

फुलसावंगी ते ढाणकी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. ठिकठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी पर्यायी बनवलेला पुल पावसाने वाहून गेला. मुसळधार पावसाने येथील ढाणकी ते फुलसावंगी रस्त्यावरील पुल निर्मितीचे काम सुरू आहे. पुलासाठी पर्याय म्हणून बाजूनेच एका तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसाने सदरील पुल वाहून गेला. त्यामुळे वाहतूक दिवसभर बंद होती. तसेच शेतात जाणाऱ्या येणाऱ्यांना शेतकऱ्यांना या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीस संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर माती असल्याने वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला. विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून पर्यटकांची धाव घेतली. सेल्फी फोटो काढून पर्यटक आनंद घेत आहेत.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.