Navneet Rana : आमच्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीचं, नवनीत राणा यांनी उधळली या नेत्यावर स्तुतीसुमनं

| Updated on: Jan 11, 2023 | 5:13 PM

नवनीत राणा म्हणाल्या, सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात.

Navneet Rana : आमच्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीचं, नवनीत राणा यांनी उधळली या नेत्यावर स्तुतीसुमनं
नवनीत राणा, खासदार
Follow us on

अमरावती : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. यात शंकाच नाहीत, असं राणा म्हणाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. अमरावती येथील सभेत त्या बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात. यात काही शंका नाही.

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.

स्वाभीमानला विनंती करणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. बडनेरा मतदारसंघात खासदार आणि आमदार भाजपचे यावे यासाठी आम्ही युवा स्वाभिमानला विनंती करणार आहोत.

त्यांना ही विनंती करू की त्यांनी राष्ट्रीय पक्षात काम करावं. 2024 पर्यत त्यांचं मनपरिवर्तन होईल. कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला विकास महत्वाचा आहे.

राणा दाम्पत्यानं राष्ट्रीय पक्षात यावं

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भाजपमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी.

त्यांनी राष्ट्रीय पक्षात यावं ते राष्ट्रीय पक्षात काम करण्यायोग्य आहे. त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा ते पक्षात आले तर खऱ्या अर्थाने त्यांचा मान सन्मान केला जाईल.

आज सकाळी बच्चू कडू यांचा अपघात झाला. ते नागपूर येथील रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बच्चू कडू यांनी पदवीधर निवडणुकित आमच्या सोबत यावं, यासाठी त्यांना विनंती करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले.