AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, अमरावतीच्या सभेत विधान परिषद निवडणुकांचं रणशिंग

महाविकास आघाडी कडून अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार आहे. भाजपचे रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात ही लढत होणार आहे...

मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, अमरावतीच्या सभेत विधान परिषद निवडणुकांचं रणशिंग
Image Credit source: social media
| Updated on: Jan 11, 2023 | 3:55 PM
Share

स्वप्निल उमप, अमरावतीः मागील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने वसुलीचे सर्व उच्चांक गाठले. त्या काळात वर्क फ्रॉम होम (Work from home) होते, तसे मंत्रीही वर्क फ्रॉम जेल होते. जेलमध्ये असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. अमरावतीत (Amravati) विभागातील विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ 12 वर्षांपासून रणजीत पाटील पदवीधर मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यादा भाजपाला ही जागा निवडून आणता आली.. आपल्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री होता आले.. सध्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्री नाही त्यामुळे त्यांचा कारभार आम्हाला पाहावा लागतो.. मी मुख्यमंत्री असताना माझ्या अनुपस्थितीत रणजित पाटील यांनी चांगलं काम तेव्हा केलं. पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. आजही सभागृहात पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात.

अमरावती विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसचे धीरज लिंगाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उपस्थितीत धीरज लिंगाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडी कडून अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार आहे. भाजपचे रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात ही लढत होणार आहे…

नवनीत राणांच्या वक्तव्याची चर्चा…

अमरावतीतील या सभेत खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, यात शंका नाही, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं.

बावनकुळे काय म्हणाले?

या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  ‘ पदवीधर आणि शिक्षकाना न्याय देन्यासाठी फडणवीस शिंदे यांचं सरकार यावं लागलं. मागचं सरकार हे फेसबुक लाइव्ह आणि टोमणे सरकार होतं….

आपलं सरकार आल्या बरोबरच ओबीसीला आरक्षण देण्याचं काम फडणवीस शिंदे सरकारने केलं. नाशिकच्या 117 अपक्ष सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला… खऱ्या अर्थाने जनेतला न्याय देण्याचं काम या सरकारने केलं आहे…दोन वेळच्या निवडणुक पेक्षा दीड पट मते हे रणजित पाटील यांना मिळतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.