अर्ध्या रात्री काँग्रेस नेत्याला उठवावं, 1 नंबरचा शत्रू कोण विचारावं… आशिष देशमुख म्हणाले.. भाजप हे उत्तर मिळणार नाही.. काँग्रेसला घरचा आहेर….

आज काँग्रेसच्या पडत्या काळात, कोणत्याही काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे... तर तो अपेक्षित उत्तर देणार, असा दावा आशिष देशमुख यांनी केलाय.

अर्ध्या रात्री काँग्रेस नेत्याला उठवावं, 1 नंबरचा शत्रू कोण विचारावं... आशिष देशमुख म्हणाले.. भाजप हे उत्तर मिळणार नाही.. काँग्रेसला घरचा आहेर....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 2:23 PM

गजानन उमाटे, नागपूरः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (Congress committee) कार्यकर्त्यांसाठी हाथ से हात जोडो.. हे महाअभियान सुरु केलंय. पण काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) नेत्यांनीच सर्वप्रथम हातात हात मिळावावेत, अशा स्थितीत जनतेच्या समोर जावं.. नम्रतेने वागणूक ठेवावी… तरच देशातील परिस्थिती बदलेल, असा सल्ला काँग्रेसच्याच नेत्याने दिला आहे. नागपूर काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी टीव्ही 9 प्रतिनिधींशी बोलताना काँग्रेसला हा घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेस नेते ज्या आविर्भावात वावरत असतात, तो सोडून द्यावा. त्यांनी नम्रपणे जनतेसमोर जावे, घरोघरी जावे, लोकांशी संपर्क साधला पाहिजे, ही काँग्रेस जनांची भावना आहे, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं.

आज काँग्रेसच्या पडत्या काळात, कोणत्याही काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे तर.. तो भाजप किंवा इतर विरोधी पक्ष आठवत नाहीत. तर काँग्रेसचाच दुसरा नेता आठवतो. ही स्थिती बदलल्याशिवाय काँग्रेसला यश येणं कठीण आहे, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचं मतात रुपांतर करणं गरजेचं आहे. महापालिका, जिल्हा परिषदा असो किंवा विधानसभा लोकसभेत इलेक्टोरल रिझल्टसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

काँग्रेस नेत्यांनी आपापसात हातमिळवणी करणं गरजेचं आहे, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना सदर विनंती करणार का, असा सवाल विचारला असता आशिष देशमुख यांनी यावरही मोठं वक्तव्य केलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या लहान नेत्यांनी त्यांना सांगू नये, मात्र या वक्तव्यांतून त्यांनीही निश्चित बोध घ्यावा, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.