बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये, ठाकरे गटाच्या नेत्याने सुनावले

| Updated on: Jul 10, 2023 | 8:19 PM

रवी राणा कोण याला नवनीत राणाचा नवरा अशी त्याची ओळख आहे. चिंच दाखवून तरुणांची मतं घेतली. चिंच दाखवून मतदान घेतलं.

बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये, ठाकरे गटाच्या नेत्याने सुनावले
Follow us on

अमरावती : उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. बऱ्याच दिवसानंतर ते दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर आमदार रवी राणा यांनी टीका केली. रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे चार वर्षानंतर पहिल्यांदा अमरावतीमध्ये आले.मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर लपून बसले होते. अमरावतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना बेड मिळत नव्हता. औषध मिळत नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवर फोनसुद्धा उचलत नव्हते. तेव्हा त्यांना शिवसैनिकांची आठवण आली नाही.

 

ठाकरे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला

खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वाचवण्याचे सांगितलं, तर त्यांनी मला आणि नवनीत राणा घरामध्ये अटक केलं. नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख तेव्हा निर्माण झाली. मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला.


चिंच दाखवून मतदान घेतलं

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, रवी राणा कोण याला नवनीत राणाचा नवरा अशी त्याची ओळख आहे. चिंच दाखवून तरुणांची मतं घेतली. चिंच दाखवून मतदान घेतलं. येणारी निवडणुकीत मराठी माणूस त्यांची औखात दाखविलं.

बायकोच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यानं टीका करू नये. निवडणुकीत उत्तर दाखवू. उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असंही नितीन देशमुख म्हणाले.

राणा दाम्पत्यांकडून आंदोलन

उद्धव ठाकरे हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते. युवा स्वाभीमानी आणि राणा दाम्पत्याच्या वतीनं हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका केली. साडी चोरी दिल्याचं म्हटलं. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

जो रामाचा नाही तो कामचा नाही

जो रामाचा नाही. तो काही कामाचा नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे शटर उद्धव ठाकरे यांनी बंद केलं. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना ते शटर सुरू करावं लागलं. हनुमान चालिकाच्या पोस्टरचा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी अपमान केला. त्यानंतर जनतेने उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडून फेकले. जपला जुत्यांनी पोस्टरला मारलं. अमरावतीच्या महिलांना उद्धव ठाकरे यांना साडी-चोरीचा अहेर दिला, असंही रवी राणा म्हणाले.