AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | अमरावतीच्या शिवसेना महानगर प्रमुखांनी युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना डिवचलं; पराग गुढधे म्हणाले, शिक्षा काय असते हे बाहेर आल्यावर कळेल..

आमच्या शिवसेनेच्या कार्यालयात युवा स्वाभिमानचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. लपून चोरासारखे पळून गेले. त्यांनी मर्दासारखं समोरून लढायचं पाहिजे होते, असं पराग गुढधे म्हणाले.

Amravati | अमरावतीच्या शिवसेना महानगर प्रमुखांनी युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना डिवचलं; पराग गुढधे म्हणाले, शिक्षा काय असते हे बाहेर आल्यावर कळेल..
पराग गुढधे म्हणाले, शिक्षा काय असते हे बाहेर आल्यावर कळेल.. Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 05, 2022 | 4:08 PM
Share

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. दरम्यान, काल त्यांना न्यायालयाने काही अटी व शर्थीसह जामीन मंजूर केला आहे. काल राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अशातच काही कार्यकर्त्यांनी अमरावती शहरातील राजापेठ चौकातील शिवसेना कार्यालयासमोर (Shiv Sena office) फटाके फोडून जलोष करत शिवसेना कार्यालयातील खुर्च्याची फेकफाक केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगर प्रमुख (Mahanagarpramukh) पराग गुढधे (Parag Guddhe) यांनी केला आहे. आता शिवसेना कार्यालयातील खुर्च्याची फेकफाक करणाऱ्या कार्यकर्त्याना शिवसेनेची शिक्षा काय असते हे लवकरच दाखवून देऊ, असा इशारा महानगर प्रमुख पराग गुढधे यांनी दिला आहे. (We will soon show the activists what the punishment of Shiv Sena is, is the warning given by Mahanagar chief Parag Guddhe.)

काय म्हणाले पराग गुढधे?

आमच्या शिवसेनेच्या कार्यालयात युवा स्वाभिमानचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. लपून चोरासारखे पळून गेले. त्यांनी मर्दासारखं समोरून लढायचं पाहिजे होते, असं पराग गुढधे म्हणाले. ज्यांनी या खुर्च्या फेकण्याचा प्रकार केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण शिवसेनेची शिक्षा काय असते हे त्या कार्यकर्त्यांना बाहेर आल्यावर कळेल, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेच्या कार्यालयावर गेल्यावर काय प्रकार होतो हे महाराष्ट्राने पाहिला आहे. आमच्या उद्धव साहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही स्वस्त बसणार नाही, असा पुनरुज्जार गुढघे यांनी केलाय. त्यामुळं आता पुन्हा शिवसेना विरुद्ध स्वाभिमानचे कार्यकर्ते असा वाद होतो की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Swabhiman activists are arguing against Shiv Sena over whether such a situation has arisen.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?