धक्कादायक! एकाच रात्री तीन गावातील 9 दुकानांत चोरी; एकाला अटक, दोन फरार

मोर्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच रात्री तीन गावात 9 दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

धक्कादायक! एकाच रात्री तीन गावातील 9 दुकानांत चोरी; एकाला अटक, दोन फरार
चोराला अटक
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 4:25 PM

अमरावती : मोर्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी (Theft) एकाच रात्री तीन गावात (Theft in three villages) 9 दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. एकाच रात्री तीन गावातील तब्बल 9 दुकानांत चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील डोंगरयावली, पाडा, आणि सालबर्डी या गावात ही चोरी झाली आहे. एकाच रात्री तब्बल नऊ दुकानात चोरी झाल्याने पोलीस काय करत होते असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. चोरांनी दुकानाचे शेटर वाकून चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशमधून अटक केली आहे.  आरोपीकडून 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे.

लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोर्शी तालुक्यातील डोंगरयावली, पाडा आणि सालबर्डी या गावत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकचा रात्री संबंधित तीन गावातील तब्बल 9 दुकाने चोरांनी फोडली. या 9 दुकांमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली.

एकाला अटक

दरम्यान सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले तीन आरोपींपैकी एका आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही मधील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. तसेच या आरोपींचा आणखी काही गुन्ह्यात हात आहे का याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

संबंधित बातम्या

11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक

Wildlife Smuggling | 3 स्टार बॅक कासव, 2 पंचम बेडूक, 4 हेजहॉगसह 30 दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी, वनविभागाने दाखवला इंगा…!

दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार