दिवाळीसाठी खास सोनेरी मिठाई, इतके रुपये किलो तरीही गर्दी…

यंदा चक्क सोन्याच्या सोनेरी चादरीने आणि ड्रायफूटच्या माध्यमातून कलश मिठाई तयार केली.

दिवाळीसाठी खास सोनेरी मिठाई, इतके रुपये किलो तरीही गर्दी...
दिवाळीसाठी खास सोनेरी मिठाई
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 16, 2022 | 6:54 PM

सुरेंद्रकुमार आकोडे, TV9 मराठी, अमरावती : दिवाळी (Diwali) म्हटलं की फराळ आलाच गोड-धोड आलं तर बाजारात असंख्य आणि वेगळ्या चवीच्या मिठाया तयार होतात. त्यात तुम्हा-आम्हा सर्वांच्या जिभेला पाणी सोडतात. अमरावती (Amravati) येथील रघुवीर मिठाईच्या (Raghuveer Sweets) दुकानात तब्बल 11 हजार रुपये किलो असलेली सोनेरी मिठाई तयार केली. सोनेरी मिठाई खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत आहे.

अमरावती शहरातील बडनेरा रोडवर रघुवीर मिठाईवाल्याची दुकान आहे. त्यांनी यंदा चक्क सोन्याच्या सोनेरी चादरीने आणि ड्रायफूटच्या माध्यमातून कलश मिठाई तयार केली. या मिठाईला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागलेली आहे.

पण खरेदी करण्यासाठीसुद्धा काही ग्राहक आतूर आहेत. अकरा हजार रुपये किलो असलेली ही मिठाई खरेदी करत आहेत. काही ग्राहकांचे म्हणणे आहे की, सुवर्ण प्राशन म्हणजे सोनं हे शरिरासाठी व आरोग्यासाठी उत्तम आहे.

सोनेरी मिठाई ही आरोग्यासाठी फायद्याचा आहे. ही मिठाई आपल्या आवाक्याच्या बाहेर जरी असली तरी थोडी का होईना यानिमित्त आपल्या पोटात सुवर्ण प्राशन जातो. म्हणूनच आम्ही मिठाई विकत घेतलेली आहोत, असं ग्राहक सांगतात.

रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट म्हणाले, या सोनेरी मिठाईला विदेशातून मोठी मागणी आहे. आर्डरनुसार विदेशात अमरावतीमध्ये तयार केलेली सोनेरी मिठाई जात आहे. ही महाग असली तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. त्यामुळं ग्राहकही या मिठाईवर उड्या मारत आहेत.