या कंपनीनं केली वादग्रस्त जाहिरात, खासदार अनिल बोंडे यांचे आरोप काय?

जोड्याची जाहिरात करताना हिंदू देवांची फोटो वापरल्याने हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.

या कंपनीनं केली वादग्रस्त जाहिरात, खासदार अनिल बोंडे यांचे आरोप काय?
अनिल बोंडे यांनी काय घेतला आक्षेप Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 7:41 PM

स्वप्निल उमप, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : मेट्रो आणि मोची या दोन कंपनीने नवरात्रीमध्ये बूट आणि चप्पलची जाहिरात केली. त्यात दुर्गा देवीचा फोटो वापरला हे चुकीचे आहे. फेसबुकवरील बुटाच्या जाहिरात वर देवीचा फोटो लावून हिंदू देवतांचा अपमान केला आहे, अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली. अनिल बोंडे म्हणाले, मेट्रो आणि आणि मोची कंपनीची ही जाहिरात आहे. तक्रार करूनही त्यांनी माफी मागितली नाही. इमेल करूनही कारवाई केली नाही.

जोड्याची जाहिरात करताना हिंदू देवांची फोटो वापरल्याने हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत. मोची आणि मेट्रो कंपनी उत्पादन खरेदी करू नका. सर्व उत्पादन खरेदी करू नका, असं आवाहन अनिल बोंडे यांनी केलं आहे.

संपर्क करूनही प्रतिसाद नाही

मेट्रो कंपनीची ही जाहिरात अजितपाल मोंगा, तुषार वानखेडे आणि पंकज निखार या तिन्ही हिंदू मुलांच्या लक्षात आली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क करण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही.

संबंधितांनी माफी मागितली नाही. जाहिरात फेसबूकवर कायम ठेवली. मेट्रो कंपनीचे फराह भांजी यांनासुद्धा ईमेलवरून तक्रार करण्यात आला. जोड्याची जाहिरात करताना हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे.

दुकानं बंद करण्याचा इशारा

मोची आणि मेट्रो कंपनीच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकावा. अमरावतीतील ही दुकानं बंद करू, असा इशारा अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

पोलिसांत तक्रार करणार आहोत. या कंपनीच्या चपला, जोडे यासाठी फोटो वापरला. त्यावर बहिष्कार टाकावा. टाळं फासणार, असल्याचं अनिल बोंडे म्हणाले. तक्रारीच्या दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना करणार असल्याचं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.